बीड

आडी वरचीवाडी येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

आडी वरचीवाडी येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

श्रीवर्धन (संदेश घोलप): म्हसळा तालुक्यातील
आडी महाड खाडी वरचीवाडी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. स्वयंभू मंदिरात सकाळी अभिषेकाने उत्सवाची सुरुवात होणार असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १०.३० वाजता स्वयंभू मंदिरात अभिषेक व महाआरती होईल. त्यानंतर ११.३० वाजता तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. दुपारी १२.०० वाजता हळदीकुंकू कार्यक्रम, तर दुपारी ३.०० वाजता गावातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. संध्याकाळी ६.०० वाजता महाआरती, रात्री ७.०० वाजता मान्यवरांचे स्वागत समारंभ, रात्री ८.३० वाजता महाप्रसाद आणि रात्री ९.३० वाजता मनोरंजन कार्यक्रम होणार आहे.
तसेच सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून रात्री ८.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाचे आयोजन ग्राम विकास मंडळ आडी (वरची वाडी), बाल मित्र मंडळ (मुंबई) आणि शिवशक्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Back to top button