बीड

संतांची सेवा करण्यासाठी देव अवतार धारण करतात- श्री ह भ प रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर 

संतांची सेवा करण्यासाठी देव अवतार धारण करतात- श्री ह भ प रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर

“सांवळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो..”

बीडच्या नेकनूर मध्ये श्रीराम कथेत श्रोते मंत्रमुग्ध…

बीड – दि-२८(प्रतिनिधी) संतांची सेवा करण्यासाठी देव अवतार धारण करतात.भक्ताची सेवा करण्यासाठी चतुर्भुज रूप धारण करतो. दोन हातांनी विदुराच्या कन्या खाता आल्या नसत्या. संत जनाबाईंच्या गवऱ्या वेचता आल्या नसत्या म्हणून चार हात घेऊन आलो. अस देव म्हणतो.देवाच्या अवताराचे महत्त्वाचे कारण संतांची सेवा आहे. अस प्रतिपादन श्री ह भ प रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांनी केले.. श्री क्षेत्र नेकनूर येथे संत बंकटस्वामी महाराज यांच्या ८२ व्या पुण्यतिथी उत्सवात चौथ्या दिवसाचे कथा पुष्प गुंफताना ते बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थिती महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री ह भ प, प्रकाश महाराज साठे,श्री ह भ प नाना महाराज कदम श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांच्यासह हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.

बीडच्या नेकनूर मध्ये भव्य श्रीराम कथेच्या चौथ्या दिवसाचे पुष्पगुंपताना श्री ह भ प रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांनी श्रीरामचंद्रांच्या जन्माची कथा, सांगताना राम हे नाव, लक्ष्मण नाव भरत आणि शत्रुघ्न यांचे नामकरण नामाचे महत्व सांगताना..राम हा सत्य आहे आणि लक्ष्मण हा समर्पण आहे अस महाराज म्हणाले यावेळी.

गीत रामायणातील गीतात सगळे श्रोते मंत्र मुग्ध झाले होते. “सांवळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो..” या यशोदेच्या मांडीवर खेळणाऱ्या प्रभू श्रीरामाची कथा ऐकताना श्रोते भाव विभोर झाले.

पुढे बोलताना. समाजामध्ये काही देवता आहेत.. वेदांनी मान्य केल्या देवता मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्यदेवो भव। अतिथिदेवो भव।”

आई देवता आहे आई मुलासाठी लहान होते.
गुरुजी देवता आहेत .गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होतातात म्हणूनच विद्यार्थी कलेक्टर होतात. विद्यार्थ्याला महान बनवण्यासाठी गुरुजी लहान होतात. मोठी माणसं लहान होण्यासाठी प्रयत्न करतात.शांती समजून सांगण्यासाठी संत एकनाथ महाराज लहान होतात.

संत बंकट स्वामी देखील वारकरी संप्रदाय तळागाळात पोहोचण्यासाठी हाती पडेल ते काम करतात लहानात लहान होतात.त्या स्वामी मृंदग कसा असावा, चाली कसा असाव्या हे बंकट स्वामी यांनी सांगितले.साधू भक्ती मध्ये रमत असतात. ते इतर कोणत्याच गोष्टीत रमत नाहीत. अस महाराज म्हणाले.. संतांचे समर्पण हे सत्यासाठी असते. असेही महाराज म्हणाले.

यावेळी कथेला साथ संगत मुख्यगायक विवेकजी महाराज गावंडे, सुरेल बासुरी वादक अभिनय महाराज,कृष्णा महाराज, तबला वादक अक्षय महाराज मोरे यांची लाभली.

Back to top button