बीड
लोकसभेत तोंड न पाहणारे क्षीरसागर-मुंडे कमळाच्या फुलात

लोकसभेत तोंड न पाहणारे
क्षीरसागर-मुंडे कमळाच्या फुलात
शिव-मिम चे मावळे भिमाच्या लेकीसाठी एकवटले
बीड, दि.27 (प्रतिनिधी) ः- बीड नगर परिषदेमध्ये नैसर्गिक-अनैसर्गिक युतींचे पेव फुटले असून केवळ आपल्याच घरात सत्ता असावी यासाठी अवघे प्रस्थापित क्षीरसागरांच्या बंगल्यात एकवटले आहेत. दुसरीकडे मात्र प्रेमलता पारवे यांच्यासाठी स्वराज्याचा पाईक असलेल्या हिंदु-मुस्लिम-मावळ ठाम निर्धाराने एकटवटला असून विकासाच्या भुमिकेवर अजितदादांच्या घडीसाठी उत्सुक दिसून येत आहे.
गेली तीस वर्षे नगर परिषदेची सत्ता एकाच कुटूंबाकडे राखीव होती मात्र नगराध्यक्ष पद राखीव झाल्याने शहरात नवे समीकरणे उदयास आली. लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव ज्या जयदत्त क्षीरसागर यांनी आखून-रेखून केला त्या क्षीरसागरांच्या मदतीला पंकजा मुंडे धावून आल्या आहेत. बारामतीचा सांगावा आल्याने दारातली हळद सोडून बीडच्या मोहिमेवर पंडितांची वर्दी लागली. बहुजनी बुध्दिजिवीमध्ये गेवराईच्या पंडितांचा शब्द प्रमाण मानला जात असल्याने आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार मुजीबभाईच्या सासू असल्याने राष्ट्रवादीची घडी विजयसिंहांनी बसवली. प्रचारात प्रचंड-उदंड प्रतिसाद सामान्य मतदारांत मुजीब यांची असलेली क्रेझ, अजित पवारांची शिस्तप्रिय विकासनिती लक्षात घेता घडीने प्रचारात थेट आघाडी घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागलेल्या पराभवात क्षीरसागरांनी हातभार लावला हे मुंडेंच्या वोट बँकेला रुचेल असे वाटत नाही. केवळ क्षीरसागरांचा बालहट्ट पुरवण्यासाठी मुंडेंचा पारंपारिक मावळ आणि थोरल्या क्षीरसागरांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे तितके कारण वाटत नाही. अशा स्थितीत अजित पवारांनी मुजीब यांचा चेहरा पाहून एका दलितमित्राच्या कन्येला दिलेली उमेदवारी अधिक आश्वासक ठरते.
![]()


