बीड

जामखेड तहसील कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जामखेड तहसील कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जामखेड : शहरातील तहसील कार्यालय येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी ९.३० वाजता करण्यात आले. राष्ट्रीय गीताने व भारत माता की जय,वंदे मातरम् या जयघोषात परिसर दुमदुमला.
यावेळी प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. तसेच समाजातील प्रत्येकाने देशहिताला प्राधान्य देऊन जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे,महसूल नायब तहसीलदार किशोरी त्र्यंबके,मंडल अधिकारी प्रशांत माने,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामदास मोराळे,कृषी अधिकारी रविंद्रकुमार घुले,माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर, मंगेश आजबे, प्राध्यापक लक्ष्मणराव ढेपे,नगरसेवक दिगांबर चव्हाण,आदर्श फाऊंडेशन चे अध्यक्ष आकाश बाफना,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे,आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा,प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युमभाई सुभेदार,कॅप्टन लक्ष्मण भोरे, सलिम तांबोळी,महसूल सहायक अधिकारी अनिल जाधव,सचिन आगे,होमगार्ड विभागाचे तालुका समादेशक नागेश घायाळ,अकबर शेख आदी तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलिस अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button