संपादकीय

‘हा कार्टा सिंधुदुर्गाच्या मातीत कसा जन्मला हेच कळत नाही’;

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी आंदोलनात घुसल्यामुळे वाद पेटला आहे. त्यातच आता या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी परवाहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली.

तसेच भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन नितेश राणेंनी आंदोलकांची भेट घेतली आणि माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. ‘अनिल परब सिंधुदुर्गातील आहेत, पण आमच्या मातीत हा कार्टा कसा जन्मला हेच कळत नाही. मला आज दोन ते तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, मी अनिल परब यांच्या घरी नेऊन सोडतो, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

राणे पुढे म्हणाले, अनिल परब यांना बदाम पाठवा, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. डोक्यावर चार-पाच केस राहिले म्हणून त्याला काही कळत नाही. हा जी वसुली करतो ती सर्व उद्धव ठाकरेंना द्यावी लागते. उद्धव ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया झाली. पण उद्धव ठाकरेंना कणा दिला आहे का? असा प्रश्न पडतो. शाहरुखचा मुलगा जेलमध्ये असताना यांना झोप देखील लागत नाही. विलीनीकरण झाले तर अनिल परब वसुली कशी करणार? अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.

Back to top button