बीड
केजमध्ये थरार! भांडण सोडवायला गेलेल्या २५ वर्षीय हॉटेल चालकाचा चाकू भोसकून निर्घृण खून.

केजमध्ये थरार! भांडण सोडवायला गेलेल्या २५ वर्षीय हॉटेल चालकाचा चाकू भोसकून निर्घृण खून.
” परिसरात प्रचंड तणाव,तीन वेळा रास्ता रोको आंदोलन.
“केज मध्ये कडकडीत बंद.
केज/प्रतिनिधी
केज शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे.हॉटेलवर सुरू असलेले दोन गटांतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास नवनाथ घुले वय २५, वर्ष रा.टाकळी,ता. केज या निष्पाप तरुणाचा पोटात चाकू भोसकून निर्घृण खून करण्यात आला आहे. केज-बीड राष्ट्रीय महा मार्गावरील बंद असलेल्या समर्थ बिअर बारसमोर काल ही घटना घडली.या घटनेमुळे केज शहरासह परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून,आरोपींच्या अटके साठी संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहिती नुसार,विलास घुले हा तरुण हॉटेल चालक होता.केज-बीड राष्ट्रीय महामार्गावर रेणू बिअर बारच्या समोर आणि सध्या बंद असलेल्या समर्थ बिअर बारच्या समोरील रोडवर (कदमवाडी आणि टाकळी फाटा दरम्यान) काल काही जणांमध्ये जोरदार भांडण सुरू होते.हॉटेलवर बसलेल्या एका अनैतिक संबंधातून हे भांडण होत असल्याचे समोर आले आहे.तिथून जात असलेला विलास घुले हा केवळ वाद मिटवण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला. मात्र,वाद घालणाऱ्या नराधमांनी “तू मध्ये पडू नकोस” असे म्हणत विलासवरच हल्ला चढवला.या वादात आरोपींनी त्याच्या पोटात चाकूने सपासप वार केले हा हल्ला इतका भीषण होता की,गंभीर जखमी झालेल्या विलासचा आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. एका निष्पाप तरुणाचा नाहक बळी गेल्याने संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे.
“संतप्त नागरिकांचे तीन वेळा रास्ता रोको आंदोलन.
विलास घुले याच्या हत्येचे वृत्त समजताच टाकळी गावात व केज शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणी साठी नातेवाईक आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली.केज शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल दोन वेळा ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.याशिवाय,टाकळी फाट्यावरही नागरिकांनी रस्ता अडवून धरत प्रशासनाचा तीव्र निषेध केला.या लागोपाठ झालेल्या तीन आंदोलना मुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
“कदमवाडी आणि सोनीजवळा येथील ९ जणांवर गुन्हा दाखल.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून,आरोपी हे कदमवाडी आणि सोनीजवळा या गावांतील रहिवासी आहेत.मयताचे भाऊ रमेश नवनाथ घुले यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं.३९२/२०२६ कलम १०३ (१),१०९ ,१८९(२), १९१(२),१९१(३),१९०बी.एन.एस.गुन् हा दाखल करण्यात आला आहे.
“पोलिसांनी खालील ९ आरोपींची नावे जाहीर केली आहेत.
बाबासाहेब गुरुबा कदम,
मंगेश गुरुबा कदम,
रामेश्वर गायकवाड,
शुभम रामभाऊ गायकवाड,
भैय्यासाहेब गायकवाड,
अजय उर्फ बंकट कदम,
नवनाथ परसराम कदम,
दीपक परसराम कदम,
संतोष नरहरी कदम
दोन आरोपी गजाआड; इतर आरोपींनाही लवकरच पकडणार -पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे
घटनेचे गांभीर्य ओळखून केजचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी पथकांसह तात्काळ कारवाई सुरू केली आहे. गुन्ह्याचा तपास सपोनी उंबरे साहेब,पोनि स्वप्नील उनवणे हे करत आहेत. गुन्ह्याची गंभीरता बघता प्रभारी अधिकारी पोनि स्वप्नील उनवणे यांनी तपास हाती घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील दोन आरोपी या गुन्ह्यात सहभागी असून इतर दोघांची कसून चौकशी केली जात आहे.उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाली असून,सर्व आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील.
— स्वप्नील उनवणे (पोलिस निरीक्षक,केज)
पोलिसांच्या या ठोस आश्वासनानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले असले,तरी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.टाकळी गावात व केज शहरात अद्यापही तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
“केज शहरात कडकडीत बंद.
या. प्रकरणात आज केज शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला असून गावकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत असून सर्व आरोपींना अटक केल्या शिवाय प्रेत ताब्यात घेतले जाणार नसून, वातावरण अतीसंवेदनशील होत चालले आहे नातेवाईक, गावकरी तसेच सर्व समाजआक्रमक झालाचे दिसून येत आहे.
“चोख पोलिस बंदोबस्त.
केज शहरात तणावाचे वातावरण असून त्या पार्श्वभूमीवर शहरात अत्यंत कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिस यंत्रणा सतर्क आहे तसेच परिस्थिति नियंत्रणात असून पोलिस प्रशासन परिस्थिती वर बारीक लक्ष ठेवून आहे.



