बीड

पाथर्डीत पोलिसांची धडक कारवाई अवैध मावा व मशिनरीसह चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पाथर्डीत पोलिसांची धडक कारवाई अवैध मावा व मशिनरीसह चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्या नगर:-गेल्या शनिवारी पाथर्डी शहरातील काही भागात अहिल्यानगर चे डी. वाय. एस.पी. परिविक्षाधीन पोलीस उप -अधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली अवैध मावा निर्मिती साठा विक्रीसह बेशिस्त वाहन चालकांवर कड्क कायदेशीर कारवाई करण्यात आली. पाथर्डी तालुक्यातील खंडोबा माळ, चिंचपूर रोड आणि कसबा पेठ येथे धाड टाकून सुमारे चार लाख रुपयांचा मावा व मशिनरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. तसेच *पाथर्डी शहरातील रोड रोमिओंवर कारवाई केली
या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, तयार मावा, मिक्सर व सुपारी कटिंग मशिन जप्त करण्यात आले. संबंधितांवर अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर शहरातील कोरडगाव चौक, नाईक चौक व अजंठा चौक येथे वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर व रोड रोमिओंवर कारवाई करण्यात आली. यामुळे परिसरातील गर्दी हटवली गेली असून नागरिकांतून या कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.

Back to top button