बीड
बाजीराव पाटील विद्यालयात रक्षाबंधन व क्रांतीदिन उत्साहात संपन्न

बाजीराव पाटील विद्यालयात रक्षाबंधन व क्रांतीदिन उत्साहात संपन्न –
जांब स्फुर्ती शिक्षण प्रसारक मंडळ जांब संचलित बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जांब ता.शिरूर का.येथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक खाडे टी व्ही तर प्रमुख पाहुणे भांगे सर या प्रसंगी रक्षाबंधनाचे महत्व जायभाये सरांनी प्रस्ताविकातून व्यक्त केले शाळेतील मुलींनी मुलाना राखी बांधून औक्षण केले .विद्यालयाचे सहशिक्षक मोरे सर यांनी आपल्या मनोगतातून रक्षाबंधन व क्रांती दिनाचे महत्व सांगितले तसेच जामकर सर यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची माहिती दिली यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भांगे सर यांनी रक्षाबंधना निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य खाडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मूला मुलींना राखी पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक, मिसाळ सर,मोरे सर,जायभाये सर,जामकर सर,कराड सर,पठाण सर,खेडकर सर,सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार जायभाये सरांनी मानले



