बीड

श्री नागेश व कन्या विद्यालयात: रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन

श्री नागेश व कन्या विद्यालयात: रयत माऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन

जामखेड प्रतिनिधी:
आज, बुधवार १८ मार्च २०२६ रोजी रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्कूल कमिटी सदस्य तसेच ज्येष्ठ नेते सुरेश भोसले,प्रा.मधुकर राळेभात,प्रकाश सदाफुले,प्रा.कुंडल राळेभात तसेच श्री नागेश विद्यालयाचे प्राचार्य भगवान मडके, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी भोर,पर्यवेक्षक शिवाजी जाधवर, साहेबराव मांडे, भास्कर साळुंखे,संतोष ससाणे,निलेश अनारसे, मोहन यादव,सुग्रीव ठाकरे, अशोक घोडके, शिक्षिका मनीषा कोल्हे,मीरा साळुंखे आदी मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा.मधुकर राळेभात म्हणाले की,माऊली हा शब्द केवळ त्या लोकांसाठी आहे जे निस्वार्थ भावनेने समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात. रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील ही अशाच माऊलींपैकी एक. त्यांनी दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःच्या सारखं सांभाळलं, मौल्यवान दागिने मुलांसाठी खर्च केले. ३५ वर्षांच्या जीवनात त्यांनी सर्वस्व समाजासाठी अर्पण केले.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील खरी रयतेची माऊली आहे.

यावेळी जेष्ठ नेते सुरेश भोसले म्हणाले की,रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास म्हणजे समाजसेवेचा खरा आदर्श आहे.मुलांच्या संगोपनासाठी निस्वार्थता, समर्पण आणि प्रामाणिकपणाचा अद्वितीय संगम दिसतो.अशा माऊलींमुळे समाजाला नवे ध्येय मिळते, नवे आदर्श उभे राहतात. त्यांच्या सेवाभावनेची प्रेरणा आपल्याला प्रत्येक क्षण आठवत राहते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंभूदेव बडे व सरकुंडे नामदेव यांनी केले तर आभारप्रदर्शन पर्यवेक्षक शिवाजी जाधवर यांनी मानले.

Back to top button