गफ्फारभाई पठाण यांचा वारकऱ्यांना आदरातिथ्य ;पायी दिंडीचे स्वागत

गफ्फारभाई पठाण यांचा वारकऱ्यांना आदरातिथ्य ;पायी दिंडीचे स्वागत
वारकऱ्यांसाठी चहा नाष्ट्याची व्यवस्था, सामाजिक उपक्रम कौतुकास्पद
जामखेड प्रतिनिधी – सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे जामखेड तालुक्यातील पाटोदा (ग.) येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी आज दिनांक २८ जून २०२५ रोजी श्री क्षेत्र भवरवाडी ते पंढरपूर दरवर्षी पायी जाणाऱ्या पालखी दिंडीचे भक्तिभावाने स्वागत केले.
ही दिंडी हभप कांताताई सोनटक्के (महाराज) यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली दरवर्षी निघत असते. दिंडीच्या स्वागतप्रसंगी गफ्फारभाई पठाण मित्र परिवारातर्फे सर्व वारकऱ्यांसाठी चहा, पाणी व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी हभप कांताताई सोनटक्के (महाराज) यांचा सन्मानही करण्यात आला. गफ्फारभाई पठाण मित्र परिवारातर्फे त्यांना शाल, श्रीफळ व फेटा देऊन गौरविण्यात आले. उपस्थित वारकऱ्यांनी गफ्फारभाई पठाण यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.



