बीड

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात साजरी  

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती महामानव अभिवादन ग्रुप तर्फे उत्साहात साजरी

( गीता कन्या प्रशालेत ३०० विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करून विनम्र अभिवादन )
 बीड (प्रतिनिधी ) – अठरापगड समाजातील शूरवीर मावळ्यांना एकत्र करून स्वराज्यातून सुराज्य स्थापन करण्याकरिता बालपणापासूनच बाल शिवरायांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता, जिजाऊ व शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये “बंधू आणि भगिनींनो” असा प्रारंभ करून, बंधुता, मैत्री, प्रेम व करुणा ह्य तथागतांच्या महान उपदेशाला समोर ठेवून परिषदेत आपले मनोगत व्यक्त करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती महामानव अभिवादन ग्रुपने गीता कन्या प्रशाला बीड येथील ३०० विद्यार्थिनींना शालेय साहित मान्यवरांच्याहस्ते वाटप करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्रीमती जयश्री पांगारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सीईओ पी.व्ही. बनसोडे, सेवानिवृत्त एलआयसी प्रबंधक यु.एस.वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. विचार मंचावर महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, प्रा. अशोक गायकवाड, अँड.तेजस वडमारे, के.एस.वाघमारे,अर्जुन जैजाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , स्वामी विवेकानंद, व स्वर्गवासी केशर काकू यांच्या क्षीरसागर प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प पुष्प माला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख मॅडम यांनी केले. तर प्रस्ताविक जी.एम. भोले यांनी करून आपल्या प्रास्ताविकेत महामानव अभिवादन ग्रुप राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. आजच्या विद्यार्थ्यांनी व तरुण पिढीने सर्वच आदर्श महापुरुषांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांनी दाखवलेल्या आदर्श मार्गाचा अंगीकार करणे, व आपल्या जीवनाची वाटचाल तशी ठेवणे तसेच वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रंथप्रेमी बनणे कसे गरजेचे आहे हे स्पष्ट केले. हाच उपदेश डोळ्यासमोर ठेवून महामानव अभिवादन ग्रुपने विद्यार्थी वर्गाशी सतत संपर्क ठेवण्याचा मार्ग निवडला आहे असे सांगितले. सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत असणाऱ्या तीन विद्यार्थिनींना व स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत असणाऱ्या एका विद्यार्थिनीला आणि राष्ट्रमाता जिजाऊ, मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते विशेष बक्षिसे दिली. विद्यार्थिनीशी हितगुज साधताना ,श्री. गवते व अर्जुन जौजाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात पांगरकर मॅडम यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर सखोल प्रकाश टाकून अशा प्रकारच्या कार्यक्रमातून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणे कसे गरजेचे आहे व त्यातून नैतिक आचरणाचे धडे कसे मिळतात हे समजावून सांगितले.
 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गवते सर यांनी व्यक्त केले कार्यक्रमास सर्वश्री शिक्षक शिरसाट, चव्हाण, देवमाने, सिद्धार्थ जगझाप , कुलकर्णी, शेख मॅडम, सर्वच शिक्षेततर कर्मचारी व महामानव अभिवादन ग्रुपचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होती व विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
Back to top button