दिघोळ येथे संत एकनाथ महाराज पालखीचे भव्य स्वागत*l प्रशासनाची चोख व्यवस्था ; सोहळा शांततेत पार

दिघोळ येथे संत एकनाथ महाराज पालखीचे भव्य स्वागत*l
प्रशासनाची चोख व्यवस्था ; सोहळा शांततेत पार
जामखेड प्रतिनिधी – संत श्री एकनाथ महाराज यांच्या पालखीचे काल, बुधवार दिनांक २५ जून २०२५ रोजी, जामखेड तालुक्यातील दिघोळ गावात आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने आणि जल्लोषात या पालखीचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी दिघोळ येथे दाखल झाली.
संत श्री एकनाथ महाराज पालखी ही राज्यातील प्रमुख दिंड्यांपैकी एक मानली जाते. पालखीच्या आगमनप्रसंगी दिंडीचे प्रमुख चालक रघुनाथ बुवा गोसावी महाराज यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, तहसीलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी शुभम जाधव,तालुका अधिकारी डॉ. सुनील बोऱ्हाडे, खर्डा स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह
राजपूत, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू, दिघोळच्या सरपंच सविता शिंदे,उपसरपंच दशरथ राजगुरू,ऋषिकेश नेहरकर,महालिंग कोरे, दत्तात्रय होनमाने,सुरज रसाळ,धिरज रसाळ, ॲड.अमृत राळेभात , नचिकेत दगडे, पिराजी दगडे आदी भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच दिघोळ,माळेवाडी व तालुकाभरातून भाविक भक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अंदाजे २० हजारांहून अधिक भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली होती. पिण्याचे पाणी, वापरासाठी सुविधा, तसेच निवासासाठी तीन जलरोधक मंडपांची उभारणी करण्यात आली होती.



