बीड

मनोरंजनार्थ क्लब च्या नावाखाली अवैध पत्त्यांचे क्लब हप्ते घेऊन सुरू….

मनोरंजनार्थ क्लब च्या नावाखाली अवैध पत्त्यांचे क्लब हप्ते घेऊन सुरू….
दोन नंबर च्या धंद्याला पैसे घेऊन एक नंबर परवाना ; उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणे प्रमुख यांची मुख संमती
==========================
एस पी साहेब आपण कितीही कायदे कडक करा ; तालुका आणि ग्रामीण चे अधिकारी भ्रष्ट कामाकडे कानाडोळा करतात…
गेवराई प्रतिनिधी :-बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी या भावनेतून नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी कडक पावले उचलले आहेत,नवनवीन नियम आणि कायदे त्यांनी अंमलात आणली ही सामान्य जनतेच्या आणि लोकांच्या हिताची आहेत परंतु या नियमाची अंमलबजावणी ग्रामीण भागातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी करत नसल्याने आजही अवैध्य धंद्यांना पाठबळ मिळत आहे.यामध्ये अवैध्य दारू विक्री,गुटखा विक्री,अवैध्य वाहतूक,अवजड वाहतूक,यांच्या अवैध्य धंद्याचा समावेश होत असून विना परवाना चालत नसलेले पत्त्याचे क्लब हे मनोरंजनाच्या नावाखाली आज जिल्ह्यात सर्रास सुरू झाले असून हे पोलिस स्टेशन,उपविभागीय पोलीस अधिकारी, एल सी बी यांना हप्ते देऊन चालवण्यात येतात हे खात्री लायक आहे .याकडे पोलिस प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याने गाव गुंडांना पाठबळ मिळते आणि यातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडते हे नक्की..
   जिल्ह्यात केज प्रकरण इतके गाजले की जिल्हा बीड आहे का बिहार हेच समजले नाही ,सरपंचाची हत्या झाल्या नंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील नवनीत कावत यांची पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांनी जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावलेले उचलले ,गुन्हेगारांना शिक्षा व्हावी , जनतेमध्ये कायद्याचा धाक रहावा,विनाकारण जनतेला त्रास होता काम नये अशी भूमिका घेतली ती आजही आहे.अवैध धंदे बंद करून जिल्ह्याची प्रतिमा मलिन होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न पोलिस अधीक्षक यांचा आहे परंतु आजही अवैध धंदे छुप्या मार्गाने सुरू आहेत आणि याला कारणीभूत स्थानिक पोलिस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत हे नाकारता येणार नाही.त्यांनी जर ठरवले तर कोणताही अवैध धंदा सुरू राहू शकत नाही हे खरं आहे पण असे होताना दिसत नाही, आजही सर्व अवैध धंदे बिनबोबाट सुरू आहेत आणि हे धंदे स्थानिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू असल्याचे दिसून येते.सध्या अवैध धंद्यामध्ये मनोरंजनाच्या नावाखाली पत्त्यांचे क्लब सर्रास सुरू आहेत.याठिकाणी मनोरंजन करण्यात येते असे दाखवण्यात जरी येत असले तरी येथे पैशाने जुगार होतो हे सर्वांना माहीत आहे.हे मनोरंजनाच्या क्लब कोणत्या नियम आणि अटीचा अधीन राहून सुरू करण्यात येतात,आणि राहू शकतात याची कल्पना कदाचित पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना नसावी त्या मुळे हप्ते घेऊन याला परवानगी देतात ही शोकांतिका आहे.आणि हेच हप्ते देणारे आम्ही किती प्रामाणिक आहोत असे ववरुण आमचे कोणीच काही करू शकत नाहीत असे वागतात.परंतु याठिकाणी मनोरंजन न होता जुगार होतो आणि याच ठिकाणी चार चार जण मिळून पार्टनर राहून कोणते मनोरंजन करतात हे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कळत नाही का ,असा प्रश्न निर्माण होतो? याबाबत याआधी ही बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती परंतु दोन तीन दिवस बंद करून हप्ते वाढवून घेऊन या बिनबोभाट क्लब ला पोलिस प्रशासन आणि उपविभाग पोलिस अधिकारी तसेच एल सी बी यांच्याकडून मुख संमती देण्यात आल्याने पुन्हा हे क्लब सुरू झाले आहेत.हे अनधिकृत कोणत्याही नियमाला धरून न चालणारे क्लब पोलिस अधीक्षक बंद करतील का हे पहावे लागेल.यावर पोलिस प्रशासन ने ठोस पावले उचलली नाही तर जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे लेखी निवेदन देवून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येईल असे एक सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी सांगितल्याने आता हे क्लब बंद होतात का याकडे पाहावे लागेल….
Back to top button