” पडीक जमीन विकास काळाची गरज “- डॉ. उमाकांत वानखेडे
पाटोदा दिनांक १६ जानेवारी रोजी, येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संचलित, वसंतदादा पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे चुंबळी येथे” युवा व शाश्वत विकास विशेष लक्ष पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास ” या उपक्रमानुसार राष्ट्रीय सेवा योजना सात दिवशीय विशेष शिबीर मौजे चुंबळी ता. पाटोदा जि. बीड येथे सुरू आहे. या शिबिरामध्ये पाचव्या दिवशीच्या उपक्रमात सकाळच्या सत्रामध्ये चुंबळी शिवारात वनराई बंधारा बांधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरार्थी स्वयंसेवकांनी श्रमदान केले.
दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये वसंतदादा पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्रविभाग प्रमुख प्रा. डॉ. उमाकांत वानखेडे यांचे ‘पडीक जमीन विकास’ या विषयावरील व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वसंतदादा पाटील महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.प्रदीप मांजरे हे लाभले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जालिंदर लोणके यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये प्रा. डॉ. उमाकांत वानखेडे यांनी विषयी मार्गदर्शन करतांना म्हटले की , ” युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पडीक जमीन विकसित करावी, आज जमिनीचे संरक्षण व संवर्धन करणे महत्वाचे आहे. आज जगामध्ये वहिती जमिनीपेक्षा पडीक जमिनीचे प्रमाण जास्त आहे, हे सर्व शेती विकसित केल्यास कोणताही देशात अन्न धान्याची टंचाई भासणार नाही.” अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपामध्ये प्रा. प्रदीप मांजरे यांनी, पडीक जमिनीचा विकास करण्यासाठी विविध उपाय योजनांची माहिती दिली. ” पडीक जमिनीचा विकास करण्यासाठी, जमिनीची धूप थांबवून, वृक्ष लागवड करून जल व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, ” असे वक्तव्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. विनोद उगले यांनी केले, तर प्रमुख अतिथी आणि उपस्थितांचे आभार कु. वैष्णवी बांगर या विद्यार्थिनीने मानले. हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका मनिषा गाडवे प्रा. डॉ. जालिंदर लोणके , प्रा. प्रदीप मांजरे,डॉ. चंद्रशेखर बनसोडे, प्रा. गोकुळ कंठाळे , याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक शिबिरार्थी कु.अमृता मकाळ,अजय लगस,चंद्रभान पवार, कु. रोशनी तागड कु. प्राजक्ता सानप, सचिन गवळी, प्रवीण वनवे, प्रसाद खाडे, यशराज वराट, कु. श्रेया खंडागळे, कु. भारती बांगर , कु. ऋतुजा बांगर इत्यादिंनी परिश्रम घेतले.