📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

एक्सपोजर व्हिजीट परराज्यातील शैक्षणिक सहलीसाठी साठी सारोळा प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक यांना सुवर्णसंधी..!

एक्सपोजर व्हिजीट परराज्यातील शैक्षणिक सहलीसाठी साठी सारोळा प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक यांना सुवर्णसंधी..!

जामखेड (प्रतिनिधी):मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत आणि SQAAF मूल्यांकनात राज्यात अग्रगण्य ठरलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथील ६ विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षिकेची ‘राज्याबाहेरील एक्सपोजर व्हिजिट’ साठी निवड झाली आहे.या संपूर्ण सहलीचे आयोजन जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सारोळा प्रशालेतील शाश्वती राहुल लिमकर,आयुष अंगद चव्हाण (इ.५ वी),यश अमोल कांबळे,लावण्या संभाजी सातपुते (इ.६ वी),कार्तिक गणेश काशीद,धनश्री अनिल काशीद (इ.७ वी) व इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका अमृता रसाळ यांना या सहलीच्या माध्यमातून दिनांक २५ मार्च २०२६ ते दिनांक २९ मार्च २०२६ पर्यंत या कालावधीत कर्नाटक राज्यातील हम्पी, धारवाड,अलमट्टी या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या सहलीच्या निमित्ताने,सर्व विद्यार्थांना व मार्गदर्शक शिक्षक यांना बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख विक्रम बडे साहेब,माजीद शेख साहेब,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे,पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे ,राहुल लिमकर,उपाध्यापक प्रशांत होळकर,उपाध्यापिका शबाना शेख,वृषाली खांदवे व अमृता रसाळ उपस्थित होते.

Back to top button