महाराष्ट्र

इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली? अतुल भातखळकर यांचा आघाडी सरकारला टोला

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लगावले होते. दररोज पत्रकार परिषेद आणि ट्विटच्या माध्यमातून मलिक समीर वानखडे यांच्यावर अधकनी वाढवण्याचे काम करताना दिसून येत आहे. याच आरोपावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी थेट आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘ठाकरे सरकारचा एक मंत्री ड्रग्ज माफियांची सुपारी घेतो आणि शिवसेना त्याचे निर्लज्जपणे समर्थन करते. तीही एका मराठी अधिकाऱ्याच्या विरोधात. इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली’, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

अतुल भातखळकर यांनी सामनाचा आग्रलेख, सचिन वाझे प्रकरण, नवाब मलिक अशा अनेक मुद्द्यांवरून आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये,’शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग माफियांवरून ओवाळून टाकलेली दिसते’, अशी टिका केली आहे. आता या टीकेला महाविकास आघाडी सरकार काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Back to top button