आरोग्य

कोल्हापुरात लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त

 

दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र मिठाईची मोठ्या प्रमाणावर मागणी वादळी असून दुसरीकडे मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोल्हापुरातील तीन कंपनीवर छापा टाकत भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले आहेत. या छाप्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील शिरोळ इथल्या शिवरत्न मिल्क अॅण्ड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट, अमवा मिल्क अॅण्ड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट, गणेश मिल्क प्रॉडक्ट या आस्थापनांवर छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ऐन दिवाळीत या ठिकाणी भेसळयुक्त खवा बनवला जात असल्याचं निदर्शनास आलं होत.

कोल्हापूरच्या शिरोळमधील शिवरत्न मिल्क कंपनीवर धाड टाकण्यात आली. यावेळी दूध पावडर आणि दह्यातील पाणी पावडरचा अपमिश्रक म्हणून वापर करून खव्याची उत्पादन, विक्री होत असल्याचे आढळले. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत ४९९ किलो भेसळयुक्त खवा आणि एकूण ११ लाख ३७ हजार ४५८ रुपयांचा साठा जप्त केला आहे.

Back to top button