बीड

बीडमध्ये १७ ऑगस्टला राज्यस्तरीय लहान मुलांचा फॅशन शो ; चला हवा येऊ द्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार भव्य सोहळा

बीडमध्ये १७ ऑगस्टला राज्यस्तरीय लहान मुलांचा फॅशन शो ; चला हवा येऊ द्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार भव्य सोहळा

बीड (दि.१०) – देवगिरी प्रतिष्ठान, संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, बीड यांच्या वतीने राज्यस्तरीय लहान मुलांचा फॅशन शो ‘चॅम्प ऑन रॅम्प २०२५’ हा भव्य कार्यक्रम रविवार, दि.१७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बीड येथील रामकृष्ण लॉन्स, कॅनॉल रोड, शाहूनगर, `बीड येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमातील सेलिब्रिटी पाहुण्यांची विशेष उपस्थिती, जी संपूर्ण कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमात राज्यभरातील विविध फॅशन डिझायनिंग कॉलेजांमधील विद्यार्थी-डिझायनर्सना स्वतः डिझाइन केलेल्या पोशाखांचे सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार असून, या पोशाखांचे सादरीकरण ३ ते १५ वयोगटातील बाल कलाकार रॅम्पवर मॉडेल्सच्या रूपात करणार आहेत.

स्पर्धा तीन गटांत होणार असून पहिला गट ३ ते ६ वर्षे, दुसरा गट ७ ते ११ वर्षे आणि तिसरा गट १२ ते १५ वर्षे असा असेल. सर्व सहभागी बालक व डिझायनर्सना ट्रॉफी, प्रमाणपत्र, प्रोफेशनल फोटोशूट आणि दोन मोफत प्रवेश पास देण्यात येतील. याशिवाय ‘बेस्ट चॅम्प ऑन रॅम्प’ आणि ‘बेस्ट डिझायनर’ या पुरस्कारांसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे सन्मान दिले जातील.

नोंदणी शुल्क ₹७०० असून जागा मर्यादित आहेत. इच्छुकांनी नोंदणीसाठी ९३१०६६६६५२ किंवा ९९७५९९४५१२ या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा पोस्टरवरील क्यूआर कोड व ऑनलाईन लिंक वापरावी. बालक व डिझायनर्ससाठी स्वतंत्र नोंदणी लिंक व क्यूआर कोड उपलब्ध असून, आपल्या श्रेणीनुसार योग्य पर्याय वापरावा. पालकांनी आपल्या मुलांची त्वरित नोंदणी करून त्यांना फॅशन रॅम्पवर झळकण्याची संधी द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button