संपादकीय

कोरोना तपासणीला विरोध केल्यास थेट गुन्हा दाखल करा

 

सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाच्या नव्या संसर्गाने सर्व सामान्य नागरिकांची चिंता वाढवली आहे. तसेच वाढत्या धोक्यामुळे अद्यापही कोरोनाच्या चाचणीला काही नागरिक विरोध करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महत्वपूर्ण आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यांच्या मार्फत देण्यात आले आहे.

ओमायक्रोन विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोविड नियमांचे पालन करावे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची नियमानुसार तपासणी करावी जे तपासणीसाठी विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. जिल्ह्यातील प्रवेश ठिकाणांवर परिवहन विभागाने कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांची नियमानुसार काटेकोरपणे तपासणी करावी असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यलायत आयोजित कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, लसीकरण झाले तर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होईल त्यामुळे सर्व नागरिकांनी लसीकरणाच्या विशेष मोहिमेला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. ज्या भागात लसीकरण कमी आहे तेथील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त करावे. हातगाडी चालक, दुकानदार यांच्या लसीकर करण्यावर अधिक भर द्या जर कोणी तपासणी साठी विरोध करीत असेल अशा वर गुन्हे दाखल करा असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत आदेश दिले.

Back to top button