राजकीय

नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना सरकारी पदे दिली. त्यांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केले. तसेच मुन्ना यादव यांच्यावर गुन्हे दाखल असताना अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद कस दिलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.

त्यावर स्पष्टीकरण देताना मुन्ना यादव म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मला बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष केले. कारण मी बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर असलेले गुन्हे हे राजकीय आहेत. निवडणुकीच्या वादातून हे गुन्हे विरोधकांनी माझ्याविरोधात दाखल केले आहेत. आंदोलन करीत असताना राजकीय गुन्हे दाखल होतात. माझ्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नाहीत. याप्रकरणी आधीच माझी चौकशी झाली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपचा १० वर्षे नगरसेवक होतो. त्यामुळं माझ्यावर काही राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे मुन्ना यादव यांनी दिले आहे तसेच नवाब माली यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेत सुद्धा त्यांनी दिले होते.

Back to top button