बीड

अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली अमोल कोरडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली

अमोल कोरडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
बीड, प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन तथा महाराष्ट्रा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे आणि संसदरत्न खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृवाखाली सुरु असलेल्या शिवसनेच्या दमदार अशा कार्यपद्धतीस प्रभावित होऊन अमोल कोरडे मा.अध्यक्ष एसटी कामगार सेना बीड यांनी काल रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटातून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना मराठावाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन यांनी अमोल कोरडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक, स्वप्नील गलधर याबरोबरच शिवसेना महिला आघाडी युवसेना शेतकरीसेना आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, तथा शिवसैनिकांची उपस्थिती होती.
°°°°°
Back to top button