📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सुशिक्षित उमेदवारांना मतदान करा,विकास आम्ही करु ! – सुनंदाताई पवार

सुशिक्षित उमेदवारांना मतदान करा,विकास आम्ही करु ! – सुनंदाताई पवार

उमेदवार सौ. गिरमे व आजबे यांच्या प्रचारार्थ ; सुनंदाताई पवारांचा घराघरांत प्रचार

जामखेड,दि.२८ :जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराला जोरदार वेग आला असून कॉर्नर सभा, पदयात्रा आणि घरोघरी भेटीमुळे वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ. संध्याताई शहाजी राळेभात तसेच प्रभाग क्रमांक ११ ब) च्या उमेदवार सौ. अपूर्वा अमोल गिरमे (सर्वसाधारण महिला) आणि उमेदवार अ) हरिभाऊ नारायण आजबे (सर्वसाधारण पुरुष) यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित (दादा) पवार यांच्या मातोश्री तसेच बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी शनिवारी प्रभागात घर टू घर प्रचारात भेटीगाठी घेऊन धडाका लावला.

घरोघरी भेटीदरम्यान महिलांशी संवाद साधताना सुनंदाताई पवार म्हणाल्या, आमदार रोहित(दादा)पवार यांच्या विकासकामांच्या बळावर जामखेड शहरासह जमादारवाडी, बटेवाडी, मुंजोबा गल्ली, बेलेकर वस्ती, आरोळे नगर या भागांना नवा चेहरा मिळाला आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि काम करणाऱ्या उमेदवारांना संधी द्या; विकासाची हमी आम्ही देतो.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते अमोल गिरमे यांची प्रामाणिक कार्यशैली, स्थानिक प्रश्नांची अचूक जाण आणि सर्वसमावेशक विकासाची भूमिका मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः महिला, तरुण आणि ज्येष्ठ मतदारांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता या गटाची पकड आणखी मजबूत होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

जमादारवाडी येथील महिलांनी सुनंदाताई पवार यांच्या भेटीवेळी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. त्यामुळे प्रभाग ११ मध्ये महिलांचा निर्णायक पाठींबा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांकडे स्पष्टपणे झुकत असल्याचे जाणवत आहे. परिणामी सौ.अपूर्वा अमोल गिरमे (ताई) यांचे पारडे जड होऊ लागल्याची चर्चा प्रभागात चांगलीच रंगत आहे.

Back to top button