संपादकीय

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत शिरीषा स्वामीचे घवघवीत यश

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत शिरीषा स्वामीचे घवघवीत यश
बीड प्रतिनिधी
शिरीषा विकास स्वामी हिने महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 च्या मुख्य परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत घवघवीत यश मिळवले आहे.तिच्या या सुयशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विशेष बाब म्हणजे बीड जिल्ह्यातून तीने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवले आहे.
बीड येथील संस्कार विद्यालयाची विद्यार्थिनी शिरीषा विकास स्वामी हिने दहावी परीक्षेत 97 टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यात यश मिळवले होते. यानंतर बारावी परीक्षेत तिने विशेष प्राविण्यात यश मिळवत आयआयटी ला पात्र ठरली.सीईटी परीक्षेत ती एस्सी प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिली येणारी बीड जिल्ह्यातील पहिली कन्या ठरली होती. तिने इंदोर येथे आयआयटी विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे येथे यूपीएससी एमपीएससीचा सराव केला. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेत यश मिळवल्यानंतर तिने या अंतर्गत झालेल्या मुख्य परीक्षा 2023 मध्ये देखील विशेष प्राविण्यात उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे या परीक्षेला महाराष्ट्रातून 50,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी केवळ पंधराशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्यातून शिरीषा स्वामी हिने घवघवीत यश मिळवले. या अवघड परीक्षेतून यश मिळवत आता येणाऱ्या मुलाखत परीक्षेत यश मिळवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता वर्ग एक साठी तिचे निवड होईल. तिने यामध्ये देखील यश मिळवावे यासाठी सर्व सरातून तिला शुभेच्छा मिळत आहेत. शिरीषा स्वामी हिने मिळवलेल्या यशा मधून बीड जिल्हाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मान उंचावली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थी देखील आहेत बीड जिल्हा केवळ बदनाम जिल्हा नाही हे तिने तिच्या सूयशातून सिद्ध केले आहे. तिच्या या सुयशाबद्दल वडील विकास स्वामी, आई वनमाला स्वामी, काका पत्रकार वैभव स्वामी, काकू वर्षा स्वामी, यासह वैशाली अशोक पडोळे धर्माबाद, आत्या मामा तसेच रूपाली श्रीकांत स्वामी लातूर आणि समस्त येळंबकर परिवारासह संस्कार विद्यालय, शिवाजी विद्यालय अंतर्गत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Back to top button