संपादकीय

पात्र लाभार्थी आणि प्रकल्पबाधितांना घरांचे वाटप सुरू करण्याबाबत केडीएमसी आयुक्तांना पालकमंत्री यांचे निर्देश

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने राबवलेल्या बीएसयूपी योजनेअंतर्गत ७ हजार २७२ घरे बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यातील १ हजार ९९५ पात्र लाभार्थ्यांना या घरांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ४ हजार ५०० घरे बांधून पूर्ण झाल्याने ही घरे रस्ते आणि इतर प्रकल्पांतील बाधितांना विनामूल्य देण्याची आग्रही मागणी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली होती.

मात्र हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार मिळून करत असल्याने ही घरे बाधितांना देण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी गरजेची होती. याबाबत ज्यांची घरे रस्ते अथवा विकासकामांसाठी तोडली गेली असतील अशा पात्र लाभार्थ्यांना पर्यायी घरे देणे शासनाची जबाबदारी असल्याने उपलब्ध घरे लोकांना तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे बीएसयुपीमधील घरे या प्रकल्पबाधितांना उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दिपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button