बीड
भाजपच्या बीड शहर उपाध्यक्षपदावर/पदी बाळासाहेब घुमरे यांची निवड

भाजपच्या बीड शहर उपाध्यक्षपदावर/पदी बाळासाहेब घुमरे यांची निवड
बीड (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी, बीड शहर संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाच्या शहराध्यक्ष अशोक लोडा आणी जेष्ट नेते नवनाथ आण्णा यांच्या मार्गदर्शना खाली पक्ष आदेशानुसार बाळासाहेब मनोहरराव घुमरे यांची बीड शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या शहरस्तरीय कामकाजाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला आहे.
बाळासाहेब घुमरे हे सामाजिक, संघटनात्मक व पक्षकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षाशी असलेला एकनिष्ठ पणा आणी त्यांची निवड पक्षाच्या हिताची राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असून पक्षाच्या विचारधारेप्रती त्यांची निष्ठा व तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क या सर्व बाबी लक्षात घेऊनच पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नियुक्तीपत्रात भाजपच्या ध्येय-धोरणांनुसार संघटन मजबूत करणे, पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच लोकनेते ना. पंकजाताई मुंडे व माजी मंत्री डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षकार्य प्रभावीपणे करण्यात भर पडणार. या वेळी भाजपा ज्येष्ठ नेते भाजपा शहर अध्यक्ष अशोक लोढा नवनाथ अण्णा शिराळे
प्रदेश कार्यकारणी सदस्य सर्जेराव तांदळे, ज़िल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, शहर अध्यक्ष अशोक लोढा, देविदास नागरगोजे, संतोष भाऊ वेदपाठक, संद्या राजपूत, भागीरथ बांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते तर बाळासाहेब घुमरे पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.


