📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शिर्डीतील गुटख्याच्या अड्ड्यावर एलसीबीचा छापा; मुद्देमालासह आरोपी गजाआड

शिर्डीतील गुटख्याच्या अड्ड्यावर एलसीबीचा छापा; मुद्देमालासह आरोपी गजाआड

 

अहिल्यानगर । :-जिल्ह्यात गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्रीसारख्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, शिर्डीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन ठिकाणी अवैध गुटखा विक्रेत्यांना गजाआड केले. एक विधीसंघर्षित बालकासह एकजण अटकेत असून एक फरार आहे. या कारवाईत २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदा करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार पथकाने न आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीमध्ये जाकीर अब्दुलशकुर अन्सारी( वय 60, रा. कालीकानगर, शिर्डी),याच्यासह एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे. तर आरोपी दिनेश शिवाजी बहिरट (रा. शिर्डी ता. राहाता) फरार आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, रणजीत जाधव, सुनिल मालणकर, रमीजराजा आत्तार व विशाल तनपुरे यांनी केली आहे

Back to top button