बीड

रामनवमी निमित्त रेल्वे वन विहारात पाणी देऊन झाडांचे संवर्धन

रामनवमी निमित्त रेल्वे वन विहारात पाणी देऊन झाडांचे संवर्धन
सोलापूर प्रतिनिधी :-रामनवमी निमित्त रेल्वे वन विहारात पाणी देऊन झाडांचे संवर्धन
आज दिनांक 06/04/2025 रविवार रोजी संभाजी तलावा जवळील रेल वन विहार मधील झाडांना  रामनवमीनिमित्त जवळपास 2500 झाडांना 11000 लिटर पाणी देण्यात आले. उन्हाळ्यामध्ये झाडांचे रोपट्यांचे संगोपन होणे अत्यंत गरजेचे असते.  नेहमीप्रमाणे रेल्वे विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाने येथील झाडांना जीवदान देण्याचे मोलाचे काम होत असते.
त्याचबरोबर जवळपास 500 किलो प्लास्टिक पिशव्या, बाटली व इतर वस्तू एकत्रित करून बायो-डीग्रेडेबल पिशव्यांचा वापर करून हा कचरा एकत्रित ठेवण्यात आले. श्री शिवाजी कदम सी.ई.एन.एच.एम./उत्तर मध्य रेल्वेचे प्रयागराज येथील अधिकारी यांनी प्लास्टिक बॅग टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले व जवळपास 100 कापडी पिशव्या त्यांच्या कडून वाटण्यात आल्या.
श्री रामलाल प्यासे वरिष्ठ मंडल यांत्रिक इंजिनियर सोलापूर व श्री  मोतेकर यांनी येथे पाणी उपलब्ध केले व श्री जितेंद्र वाघमारे सि.से.इंजी. पर्यावरण यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी श्री परशुराम लांबतुमरे, प्रवीण तळे, मुकुंद श्रेष्ठ, कुलदीप शर्मा, भिमाशा मस्के आणि झाडे लावा झाडे जगवा ची संपूर्ण टीम असे जवळपास 75 कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. या झाड संवर्धन उपक्रमामध्ये विशेषतः लहान मुलांचा सहभाग व त्यांची झाडांना पाणी देण्याची तळमळ खूप भावणारी होती. यामध्ये सुशांत पाटील, सुबोधिनी वाघमारे, शुभम मस्के, समृद्धी, विष्णू, वृक्षा आणि वैभवी गायकवाड यांनी आपले बहुमोल योगदान दिले.
या रेल्वे वनविहारांमध्ये काही असमाजिक तत्वांची माणसे येथे दारू सिगरेट व अन्यप्रकारे परिसर बाधित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे मागील वर्षी बराच परिसर जुळून खात झाला होता परंतु अथक प्रयत्नाने या झाडांना वाचवण्यात आलं.  श्री शिवाजी कदम यांनी पोलीस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून अशा लोकांचा वावर रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
Back to top button