नगरसेवक जगदीश गुरखुदे व नगरसेवक सागर देशपांडे यांचा सत्कार
बीड । प्रतिनिधी:-नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत बीड येथील प्रभाग क्र.7 मध्ये जगदीश गुरखुदे व सागर देशपांडे यांना जनतेने मतदान विजयी केले याबद्दल त्यांचा भाजपचे शेख मोहम्मद सलीम,अॅड. अक्षय भालेराव, सद्दाम आतार, गयाज आतार यांनी सत्कार करुन अभिनंदन केले.
शहरातील प्रभाग क्र.7 मध्ये पुन्हा एकदा नगरसेवकपदी जगदीश गुरखुदे यांची तर नवनिर्वाचित नगरसेवक सागर देशपांडे यांच्या पत्नी भाग्यश्रीताई सागर देशपांडे यांची निवड झाली आहे. यांना प्रभागातील जनतेने मोठे मतदान करुन विजय मिळाला आहे. याबद्दल जगदीश गुरखुदे व सागर देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.