बीड

पारगाव (जप्ती) येथे लक्ष्मण शक्तीचा भव्य मुक्ती सोहळा

पारगाव (जप्ती) येथे लक्ष्मण शक्तीचा भव्य मुक्ती सोहळा

बीड (प्रतिनिधी) तालुक्यातील पारगाव (जप्ती) येथे लक्ष्मण शक्तीचा भव्य मुक्ती सोहळ्याचे शनिवार दि.2 मे 2026 रोजी आयोजन करण्यात आले  असून पारगाव (जप्ती) पंचक्रोषितील भाविक-भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सैनिक, ऑर्नरी लेफ्टनंट त्रिंबक मारोती तिपाले यांनी केले आहे.
मौजे पारगाव जप्ती येथे गत दोन वर्षापासून लक्ष्मण शक्तीचा भव्य मुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी देखील हा सोहळा होणार असून शनिवार, दि.02/05/2026 रोजी सायं.6.00 वाजता ग्रंथ वाचनास सुरुवात होणार आहे. तसेच रविवार दि.03/05/2026 रोजी सकाळी 6 वाजता महाआरती संपन्न होणार आहे. त्यानंतर भाविक-भक्तांना महाप्रसादाची पंगत होईल. या लक्ष्मण शक्तीच्या ग्रंथाचे वाचन लक्ष्मण दादाराव तिपाले, राम बाबुराव तिपाले, सत्यवान गोपीनाथ तिपाले हे करणार आहेत. तर दिलीप शिवदास तिपाले, राजेंद्र देविदास तिपाले, सतीष राम तिपाले हे सुचक असणार आहेत. तरी पंचक्रोषितील सर्व श्रीराम भक्त, वाचक, सूचक व श्रोते मंडळी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ऑर्नरी लेफ्टनंट त्रिंबक मारोती तिपाले यांच्यासह पारगाव जप्ती ग्रामस्थांनी केले आहे.

Back to top button