परळी तालुक्यातील अन्याय पिडींतांसाठी मदतीला धावून जाणारे आ.सुरेश आण्णा धस पाटोदा तालुक्यातील पवनचक्की कंपन्यांकडुन शेतकऱ्यांवर दडपशाही प्रकरणी मुग गिळून गप्प का?? :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

—-
मा . महोदय आ. सुरेश आण्णा धस आपणास ईमेल द्वारे पाठवुन बीडकरांसाठी खुले पत्र लिहिण्यास कारण की आपण काल दि.१८ शनिवार रोजी परळी तालुक्यातील लिंबोटा गावातील शिवराज दिवटे या तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली. अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली… आण्णा आपल्या सारख्या संवेदनशील लोकप्रतिनिधींचे विशेष आभार आणि अभिनंदन…..
तुमचं विशेष अभिनंदन करून जाता जाता एक विचारायचं होतं
आणि विनंती सुद्धा करायची एक बीडकर म्हणून…
विचारायचं हेच कि पाटोदा तालुक्यातील पाचेगाव येथील शेतकऱ्यांवर पवनचक्की कंपन्यांकडून पोलिस प्रशासनाच्या मदतीने दडपशाही होते,खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते.आणि दुसऱ्या दिवशी पाटोदा तालुक्यातील दासखेड ग्रामपंचायत अंतर्गत बेडुकवाडी येथील शेतकऱ्यांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल होतात. नंतर पुन्हा दोन दिवसांनी पाटोदा तालुक्यातील जवळाला येथील शेतकरी हे प्रशासकीय अधिकारी पवनचक्की कंपन्यांना शेतकऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे सल्ले देतात, पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील शासकीय साठवण तलाववर अतिक्रमण करून रेन्यू पावर कंपनीने ४-५ कोटी रुपये खर्चून उपकेंद्र केले आहे वर्षभरापूर्वी विभागीय दैनिक पुण्यनगरीने जवळपास ७ भाग प्रसिद्ध केले आहेत. तुम्ही आता इलेक्ट्रॉनिक मिडियात जास्त दिसता त्यामुळे दैनिकात आलेल्या बातम्या वाचता कि नाही याबद्दल शंका आहे असो
आता इलेक्ट्रॉनिक मीडिया खाजगीत पवनचक्की कंपन्यांचे मालक मोठमोठाले राजकीय पुढारी आणि उद्योगपती आहेत म्हणून खालुन जरी बातम्या पाठवल्या तरी वर लावत नाहीत असं विनम्रपणे सांगतात अर्थात अपवाद म्हणून काही टीव्ही चॅनेलवर आल्या आहेत त्यांचे आभार… आणि जर विधानपरिषदेच्या उपसभापती माननीय निलमताई गो-हे पत्रकार परिषदेत सर्व शिवसेनाप्रमुख (शिंदे गट) यांच्या समोर दैनिक प्रजापत्र चे संपादक संजयजी मालाणी सर जिल्हा शासन आणि पोलिस प्रशासन यांच्याकडून शेतकऱ्यांच्या लिखित तक्रारी नंतरही बाजु ऐकुन घेतली जात नाही याविषयी प्रश्न विचारला जातो तेव्हा विषय टाळतात तसेच दैनिक लोकमत बीड जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ खताळ यांनी तुमच्या जिल्हाप्रमुखांनी यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत हे सांगितल्यावर ” ते हयात आहेत हेच भरपूर त्यांचे आभार” अशी प्रतिक्रिया देतात तेव्हा आणखी पुरावा काय द्यावा…..
आ.सुरेश आण्णा धस पाटोदा तालुक्यातील पवनचक्की कंपन्यांकडून पिडीत शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलता का???
—-
आ.सुरेश आण्णा धस यांची प्रतिमा बेधडक सर्व सामान्य माणसाला न्याय देताना प्रसंगी कायदा मोडून उदाहरण द्यायचे झाले तर कोरोना कालावधीत ऊसतोड मजुरांच्या गाड्यावर हल्ला झाला होता तेव्हा स्वतःवर गुन्हा दाखल करून घेऊन मदतीला धावले होते.असे असंख्य उदाहरणे तुमचे समर्थक सांगतील…. परळी तालुक्यातील गुंडगिरी बाबत धावपळ करत मिडीयावर पोपटासारखं बोलताना पवनचक्की कंपन्यांकडुन जिल्हा आणि पोलिस प्रशासन यांच्याकडून शेतकऱ्यांवर होणा-या दडपशाही बदल अवाक्षर बोलत नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे…. आपणास नम्र विनंती आण्णा आपण शेतकऱ्यांना न्याय द्यावा यापूर्वी मी आपणास ईमेल द्वारे लेखी निवेदन दिले आहे.
आज आढावा बैठकीत पालकमंत्री बीड अजितदादा समोर विषय मांडावा तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विषय मांडा
..ही आमची शेवटची नम्र विनंती :- डॉ.गणेश ढवळे
—
आज पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांचा बीड दौरा असुन आढावा बैठक आहे. आपण पवनचक्की कंपन्यांकडुन जिल्हा आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने आर्थिक आणि मानसिक पिळवणूक हा विषय मांडावा हि नम्र विनंती यापुढे आम्ही विषय आपणापुढे मांडणार नाही. माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले जवळचे असुन आपले ऐकतात असा आम्हाला ठाम विश्वास आहे. त्यामुळे हा विषय आपण मुख्यमंत्री महोदयांच्या कानी घालुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा
..हि शेवटची नम्र विनंती आणि आपणास ईमेल सुद्धा करत आहे.



