निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम – सुरेश भोसले

निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम – सुरेश भोसले
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
जामखेड प्रतिनिधी : आज पक्षाचा २७ वा वर्धापन दिन साजरा करताना अतिशय आनंद होत आहे. या कालावधीत पक्षाने अनेक चढ-उतार अनुभवले, मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष समाजामध्ये ठामपणे उभा राहिला आहे. सत्ता असो वा नसो, पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते समाजातील सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा २७ वा वर्धापन दिन आज दिनांक १० जून २०२६ रोजी जामखेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश भोसले, राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले.सभेत राजेंद्र कोठारी व तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना जेष्ठ नेते वैजिनाथ पोले म्हणाले की,शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारा पक्ष असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारांमुळे राज्याच्या राजकारणाला दिशा मिळाली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष हीच राष्ट्रवादीची ओळख आहे.कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि जनतेच्या विश्वासामुळे पक्ष अधिक सक्षम बनला आहे. आगामी काळात पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करु.
गेल्या २७ वर्षांच्या वाटचालीत पक्षाने अनेक आव्हानांचा सामना केला,
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, राष्ट्रवादी चे नेते सुर्यकांत मोरे, मंगेश आजबे, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रा. कैलास वराट, प्रा. लक्ष्मणराव ढेपे, बाजार समितीचे माजी संचालक सागर सदाफुले,युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, युवा नेते प्रा. कुंडल राळेभात, अमोल लोहकरे,प्रवीण उगले, बाबासाहेब मगर, इस्माईल सय्यद,धनराज राजगुरू,वसिम सय्यद, माजिद कुरेशी,बापूसाहेब कार्ले, प्रसन्न कात्रजकर,कांतीलाल वाळुंजकर,श्रीकांत लोखंडे, अनिल अडाले, बजरंग डूचे, दीपक घायतडक, दादा महाडिक, बिलाल शेख, ॲड. ऋषिकेश डूचे, अनिल रेडे,रामहरी गोपाळघरे, छत्रभुज बोलभट, सिद्धेश्वर लटके, इम्रान तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



