📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीयसोलापूर

मंद्रूपच्या सुप्रिया कासार यांना आदर्श आशा स्वयंसेविका पुरस्कार जाहीर

मंद्रूपच्या सुप्रिया कासार यांना आदर्श आशा स्वयंसेविका पुरस्कार जाहीर

सोलापूर | बीड येथील जनसहयोग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श आशा स्वयंसेविका पुरस्कार मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील सुप्रिया लक्ष्मण कासार यांना जाहीर झाला. नुकत्याच झालेल्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान एका विद्यार्थिनीने उन्हामुळे चक्कर आली होती. त्यावेळी आशा स्वयंसेविका कासार यांनी त्वरीत प्राथमिक उपचार केले. त्यांच्या सकारात्मक मदतीमुळे ती विद्यार्थिनीने उत्साहात परीक्षा दिली. त्यांनी धाडसाने वैद्यकीय मदत, आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींनी तातडीने कार्ड काढून देणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना मदत यासह गरोदर मातांना मदत, क्षयरोग मोहिम यासह विविध वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन जनसहयोग प्रतिष्ठानतर्फे आदर्श आशा स्वयंसेविका पुरस्कार जाहीर केला आहे. बीड येथे पुढील महिन्यात सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण होणार आहे. या निवडीबद्दल त्यांचा आशा स्वंयसेविकांसह, मंद्रूपच्या गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button