बीड

बीड नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौ करुणा  मस्केंना मतदारांची पसंती ?

बीड नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौ करुणा  मस्केंना मतदारांची पसंती ?
माजीमंत्री अशोक पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिल्याची भावना !
बीड प्रतिनिधी
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने बीड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांसह 30 जागेवर पंजा या चिन्हावर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. उर्वरित 22 जागेवर मित्र पक्षाचे उमेदवार उभे करून संपूर्ण 52 प्रभागांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. यामुळे मतदारांमधून नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांना सहानुभूती मिळत आहे.माजी मंत्री अशोक पाटील यांनी सामान्य उमेदवारांना संधी देऊन न्याय दिल्याची भावना आता मतदारांमधूनच व्यक्त होत आहे.
बीड नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस आय पक्षाकडून पंजा या चिन्हावर सौ करुणा मिलिंद मस्के निवडणूक लढवत आहेत.त्यांचा थेट जनतेच्या घरापर्यंत जाऊन संवाद साधण्यावर भर असल्यामुळे उमेदवार आपल्याला प्रत्यक्ष भेटून मत मागत आहे, आपल्या अडचणीत जाणून घेत आहे. यामुळे मतदारांमधून नगराध्यक्षांच्या प्रती सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. ही सहानुभूती मतांमध्ये परिवर्तित होणार असून काँग्रेस पक्षाला बीडमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व उमेदवारांसह नगराध्यक्षांच्या प्रचारासाठी काँग्रेसची सर्व टीम, प्रमुख पदाधिकारी,स्वतः उमेदवार आणि त्यांचे संपूर्ण मस्के कुटुंब बीड नगरपालिके अंतर्गत येणाऱ्या सर्व वार्डामध्ये मतदारांच्या थेट गाठीभेटी घेऊन आपले अमूल्य मत काँग्रेसच्या पंजाला द्यावे असे आवाहन करत आहेत. यामुळे निश्चितच बीड नगरपालिकेमध्ये माजी मंत्री अशोक पाटील, विद्यमान खासदार रजनीताई पाटील यांच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा निर्माण केली जाईल असा विश्वास व्यक्त होत आहे. या विश्वासाला सामान्य जनतेने स्वीकारल्यामुळे बीडमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Back to top button