बीड
शिवछत्र कार्यालयास जालना महापौर वंदना मगरे यांची सदिच्छा भेट

शिवछत्र कार्यालयास जालना महापौर वंदना मगरे यांची सदिच्छा भेट
गेवराई (प्रतिनिधी) : जालना महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती वंदना मगरे यांनी आज शिवछत्र कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी परस्पर संवाद साधत आगामी काळातील सहकार्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री. कल्याणराव आखाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सदिच्छा भेटीमुळे परिसरातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



