संपादकीय

नव्या इंजिनच्या मदतीनं धावणार कार; गडकरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

 

नवी दिल्ली | येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कार कंपन्यांसाठी फ्लेक्स फ्युअल इंजिन अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांना दिली. भारत दरवर्षी ८ लाख कोटी रूपयांच्या पेट्रोलियम उत्पादनांची आयात करतो. जर भारताची पेट्रोलियम उत्पादनांवरचं अवलंबत्व कायम राहिलं तर आयातीचं बिल हे २५ लाख कोटी रूपयांवर पोहोचेल, असंही गडकरी म्हणाले.

“पेट्रोलियम आयात कमी करण्यासाठी पुढील दोन तीन दिवसांमध्ये एका आदेशावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. या अंतर्गत कार उत्पादक कंपन्यांना फ्लेक्स इंजिनचा वापर करणं अनिवार्य असेल,” असं गडकरींनी नमूद केलं. टोयोटा मोटर कॉर्पोरेशन, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्स इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युअल इंजिनचा वापर करण्याचं आश्वासन दिल्याचं मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

फ्लेक्स इंधन हे पेट्रोल आणि मिथेनॉल किंवा इथेनॉल यांच्या संयोगातून बनविण्यात येते. भारतात पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉलचे ब्लेंडिंग करण्यात येते. हे प्रमाण दोन वर्षांमध्ये २० टक्के करण्याचे लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती होते. यामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार आहे.

Back to top button