महाराष्ट्र

अमरावतीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन; मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वागत, धारणीकडे हेलिकॉप्टरने प्रस्थान

 

-पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी) अमरावती :

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमरावती विमानतळावर आगमन होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विमानतळावर त्यांचे ओजस्वी स्वागत करण्यात आले.

स्वागतासाठी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरीया तसेच महापालिका आयुक्त सौम्या शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि स्वागताचा जल्लोष यामुळे विमानतळ परिसरात औपचारिकतेसोबतच उत्साहाचे वातावरण दिसून आले.

स्वागत सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी धारणीकडे रवाना होण्यासाठी तत्काळ हेलिकॉप्टरची वाट धरली. त्यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील प्रशासनिक आणि राजकीय हालचालींना नव्या उर्जेची चालना मिळाली आहे.

Back to top button