📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जीवनसाथीची निवड योग्य वयात करणे गरजेचे- डॉ.संजय तांदळे               

जीवनसाथीची निवड योग्य वयात करणे गरजेचे- डॉ.संजय तांदळे
बीड ( प्रतिनिधी ) : उच्च शिक्षण,रोजगाराचा अभाव आणि  करिअरच्या शर्यतीमुळे मुला मुलींचे लग्न उशिरा होत आहेत. लग्न झाल्यावर देखील पॅकेज,करिअर व उच्च शिक्षणासाठी अपत्य प्राप्तीसाठी वाढती  उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे समाजाची घटती लोकसंख्या यासारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. मुलींची घटती संख्या, व्यसनाधीनता, रोजगाराचा अभाव. अवास्तव अपेक्षा, पालक व समाजाशी संवादाचा अभाव, वधू वर परिचय मेळाव्यात सहभागाचा अभाव, लग्नात अवास्तव खर्च.आदी काराणामुळे मुला मुलींच्या विवाहास, विलंब होत आहे. विवाह योग्य वयात लग्न न  झाल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात देखील सामाजिक स्वास्थ्य बिघडलेले दिसून येत आहे.उदासीनता झटकून, पालकांशी संवाद वाढवून, जीवनसाथीची योग्य वयात निवड करणे काळाची गरज असल्याचे मत अ. भा. संत भगवान बाबा वंजारी समाज( वंजारी विश्व )वधु- वर महासंघाचे अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे यांनी जालना येथील राजश्री शाहू महाविद्यालयात दिनांक 13 सप्टेंबर 2026  रविवार रोजी वंजारी परिवाराच्या वतीने आयोजित 33 व्या राज्यस्तरीय वंजारी समाज वधु वर परिचय मेळाव्यात व्यक्त केले. तसेच डॉ. श्रीमंत मिसाळ,  प्रा. डॉ. सुखदेव मांटे, बी. आर. जायभाये आदी मान्यवरांनी देखील विवाह समस्येवर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुकाराम कोकरे यांनी केले तर आभार प्रा. डॉ.सुखदेव मांटे यांनी मानले यावेळी कार्यक्रमात बीड येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, बी. बी. जायभाये, डॉ.लक्ष्मण पवळ, भारत तांदळे, सुरेश दराडे,चांगदेव केंद्रे, विष्णू सानप, कुटे, पांडुरंग तांदळे,ॲड.संजय काळबांडे, भाऊसाहेब घुगे, बापू कायंदे, वैजनाथ कांगणे,ॲड. गजानन मांटे, ॲड. बी.आर. जायभाये,अलुशाताई जायभाये, रवी मांटे आदींसह वधू वर,पालक, नातेवाईक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button