बीड

हरित बीड  अंतर्गत लिंबागणेश येथे पोलिस प्रशासनाच्या प्रअभियानमुख उपस्थितीत वृक्षारोपण :- डॉ.गणेश ढवळे 

हरित बीड  अंतर्गत लिंबागणेश येथे पोलिस प्रशासनाच्या प्रअभियानमुख उपस्थितीत वृक्षारोपण :- डॉ.गणेश ढवळे
—–
लिंबागणेश :- (दि. ०७)हरित महाराष्ट्र अभियानाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या’ हरित बीड’ या संकल्पनेतून आज दि. ०७ गुरुवार रोजी  उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते खंडेश्वरी परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या अभियानात जिल्हा प्रशासनाने वर्षभरात १ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, आज एकाच दिवसात ३० लाख झाडांची लागवड करून हा विक्रम ” इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड “मध्ये नोंदवण्याचा मानस आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासन, शासकीय संस्था आणि सामाजिक संघटनांना विशेष सूचना देत वृक्षलागवडीत सामूहिक सहभागाचे आवाहन केले आहे.
या मोहिमेअंतर्गत बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायतच्या वतीने सार्वजनिक स्मशानभूमी, गणेश मंदिर, ग्रामपंचायत परिसर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी नेकनूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, नेकनूर पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख, तसेच पिंपळवंडी बीटचे सहाय्यक फौजदार गोविंद बडे उपस्थित होते.
वृक्षलागवडीत सरपंच बालासाहेब जाधव, ग्रामविकास अधिकारी श्रीराम वीर, डॉ.गणेश ढवळे,सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, तसेच बाळकृष्ण थोरात, विक्रांत वाणी, अक्षय वाणी, औदुंबर नाईकवाडे, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, सुरेश निर्मळ, नाना वाणी, बालाजी निर्मळ, अशोक जाधव, जिवन मुळे, सुखदेव वाणी,  शरद भोसले,केशव गिरे यांच्यासह ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमात वड, नांदुरकी
पिंपळ, बांबू, करंज, शिसे, लिंब, चिंच आदी विविध प्रकारच्या देशी झाडांची लागवड करण्यात आली.
Back to top button