बीड

मा आ.अमरसिंह पंडीत, आ.विजयसिंह पंडीत विधानसभेला दिलेला शब्द पाळला 

मा आ.अमरसिंह पंडीत, आ.विजयसिंह पंडीत विधानसभेला दिलेला शब्द पाळला

—————-
७८ वर्षानंतर पहिल्यांदा पोहचला उमापूरच्या हिंगे वस्तीला रस्ता
—————-
गेवराई दि.१८(प्रतिनिधी)
    उमापूर ग्रामपंचायत हद्दीतील हिंगेवस्तीत स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर रस्ता पोहोचला आहे. रस्त्याअभावी येथे वाहन पोहोचणे ही जिकिरीचे होते. त्यामुळे गरोदर महिला, ज्येष्ठांचे अधिक हाल होत असत. त्यामुळे येथे दळणवळणाची सोय द्यावी, अशी ३५-४० वर्षांपासून मागणी होती. परंतु त्यानंतरही रस्त्याचे काम होत नव्हते. मात्र विधानसभा निवडणुकीत मा.आ.अमरसिंह पंडीत, आ. विजयसिंह पंडीत यांच्याकडून खरेदी विक्री संघाचे सभापती जयदिप औटी यांनी या वस्तीवरील नागरीकांना शब्द मीळवुन दिला होता. वचनपुर्ती करून मा. आ. अमरसिंह पंडीत, आ. विजयसिंह पंडीत यांनी उमापूर फाटा ते हिंगे वस्ती चा दर्जेदार रस्ता मंजुर करून प्रत्यक्ष कामास काल सुरुवात झाली आहे.
    गत अनेक वर्षापासून उमापूर ते पंचाळेश्वर ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरन योजना अंतर्गत सदर काम होणार आहे एकुण सहा किमी चा रस्ता मजबुतीकरण होणार आहे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे काल माजी आ. अमरसिंह पंडीत यांचे हिंगे वस्ती येथील सुभाष हिंगे, शिवाजी जाधव, नवनाथ बांडे,सर्जेराव हिंगे,प्रशांत जाधव,मदन बांडे,राजेंद्र जाधव,उद्धव बांडे, सुरेश हिंगे, राधाकिसन बांडे,विजय जाधव, बाबासाहेब हिंगे,योगेश कोल्हे,बाळक्रुष्ण देशमुख यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.
Back to top button