बीड

बीडमध्ये वाढत्या किडनी विकारांच्या पार्श्वभूमीवर मोफत KFT तपासणीसह किडनी तपासणी व मार्गदर्शन शिबिर

बीडमध्ये वाढत्या किडनी विकारांच्या पार्श्वभूमीवर मोफत KFT तपासणीसह किडनी तपासणी व मार्गदर्शन शिबिर

बीड (प्रतिनिधी) | दि. 15 जुलै 2026 (बुधवार)

बदलती जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच इतर कारणांमुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे आजार गंभीर झाल्यानंतरच अनेकांना डायलेसिसची गरज भासते. मात्र, वेळेत तपासणी व योग्य उपचार केल्यास किडनीचे गंभीर नुकसान टाळता येऊ शकते.

याच उद्देशाने जैन सोशल फेडरेशन, अहिल्यानगर संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड (जालना रोड, छत्रपती शाहू बँकेजवळ) येथे बुधवार, दि. 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत मोफत किडनी विकार तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे किडनीच्या कार्यक्षमतेची KFT (Kidney Function Test) तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. किडनीचे आजार लवकर ओळखण्यासाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या शिबिरात खालील समस्या असलेल्या नागरिकांनी आवर्जून सहभागी व्हावे –

  • मधुमेह (Sugar) व उच्च रक्तदाब (BP) असलेले रुग्ण
  • लघवी कमी होणे, वारंवार होणे किंवा जळजळ होणे
  • लघवीत रक्त किंवा फेस येणे
  • अंगावर किंवा पायांवर सूज येणे
  • क्रिएटिनिन वाढलेले रुग्ण
  • किडनीच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असलेले नागरिक
  • डायलेसिस सुरू असलेले किंवा डायलेसिसची गरज भासू शकणारे रुग्ण

या शिबिरामध्ये सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. गोविंद कासट यांच्या उपस्थितीत रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार, औषधोपचार, आहार, जीवनशैली तसेच पुढील उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच पात्र रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत डायलेसिस सुविधेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डॉक्टरांची तपासणी व KFT तपासणी पूर्णपणे मोफत असून, मर्यादित रुग्णांचीच नोंदणी केली जाणार आहे. त्यामुळे किडनीच्या आजाराची लक्षणे असलेल्या तसेच मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी : 8262009091

 

Back to top button