आर. बी. आय. आणि श्री गजानन बँकेच्या वतीने सायबर सुरक्षा कार्यशाळा संपन्न

बीड दि.29 (प्रतिनिधी)ः- भारतीय रिझर्व बँक व श्री गजानन नागरी सहकारी बँक लिमिटेड बीड यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा कार्यशाळा सोमवारी बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ग्रँड यशोदा, बार्शी रोड, बीड येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. आर. क्षीरसागर, बँकेचे सरव्यवस्थापक एम. एस. शेख, सहाय्यक व्यवस्थापक विलास कुंबेफळकर, वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, व सर्व कर्मचारी, संचालक मंडळ, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य, इतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.राजा मचाले, एस. के. एच. मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य अरूण भस्मे, ग्राहक, सर्व सभासद, खातेदार उपस्थित होते. सदर कार्यशाळा रिझर्व बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक मनोज पौनीकर, पल्लवी निच्चल यांनी सायबर सेक्युरिटी का आवश्यक आहे व त्यावर उपाययोजना काय करावी याबद्दल सविस्तर माहिती उदाहरणासह सांगितली. तसेच सायबर क्राईम पासून बँकांनी सावध कसे राहायला पाहिजे त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. सदर कार्यशाळा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शेवटी आभार बँकेचे संचालक राजेश तांगडे यांनी मानले.



