
* ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांची शिष्टाई झाली यशस्वी *
* निळकंठ चाटे, बाजीराव धर्माधिकारी, प्रा. पवन मुंडे आदींच्या प्रयत्नांना यश *
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अगदी जम्मू-काश्मीरच्या सीमेसारखा कठीण झालेला परळी वैजनाथ ते गंगाखेड रोडवरील पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेले शिष्टाई यशस्वी झाली आहे. या पुलाचे काम सुरू होऊन नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी भाजपाचे युवक नेते निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे यांच्यासह सहकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले. पुलाचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे असुन अंतिम टप्प्यात आले आहे.
परळी-गंगाखेड रोडवरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHA) अंतर्गत प्रस्तावित पुल व रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांमुळे रखडले होते. या प्रश्नामुळे परिसरातील नागरिक, वाहतूकदार, शालेय विद्यार्थी, पालक आणि हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातांचे प्रमाणही वाढले होते. ही बाब लक्षात राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांनी या प्रश्नात स्वतः लक्ष घालून सातत्याने पाठपुरावा केला. ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे, आ. रत्नाकर गुट्टे, जेष्ठ नेते प्रा. टी. पी. मुंडे, सौ. रेखाताई गुट्टे- फड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निळकंठ चाटे व बाजीराव धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने हा गुंतागुंतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
* स्थानिक पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी झाली यशस्वी*
परळी ते गंगाखेड रस्त्यावरील पुलाचे काम मार्गी लागून परिसरातील नागरिक विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रश्न सुटावा यासाठी भाजपाचे युवक नेते निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे यांनी जेष्ठ, नेते प्रा. टी. पी. मुंडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेखाताई गुट्टे, विजयकुमार वाकेकर, डॉ. प्रदीप वांगीकर आदींच्या भेटी घेऊन जनतेच्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या आवाहनाला सर्वच मान्यवरांनी प्रतिसाद देऊन सहकार्याची भूमिका घेतली. नदीच्या पाण्यामुळे सर्वांनाच त्रास होत होता. त्यामुळे सर्वांनी योग्य त्या सूचना करून पुलाचे काम मार्गी लावण्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली.
त्यानुसार युवक नेते निळकंठ चाटे, बाजीराव धर्माधिकारी, वैद्यनाथ बँकेचे संचालक विजयकुमार वाकेकर, नगरसेवक लक्ष्मण मुरकुटे, अजय फड, नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे आदींनी प्रत्यक्ष पाहणी करून विषय समजून घेतला व आवश्यकतेनुसार काही बदल संबंधित गुत्तेदारांना सांगण्यात आले.
* अनेक अडथळे … पण निळकंठ चाटे यांच्या प्रयत्नांना यश *
परळी ते गंगाखेड रस्त्यावरील पुलाचे काम सुरू होण्यासाठी अनेक अडथळे आले. सदर जागेबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही युवक नेते निळकंठ चाटे यांच्या मध्यस्थीने संबंधितांनी सामंजस्याची भूमिका घेऊन काम करण्यास संमती दिली. निळकंठ चाटे यांनी सर्वांच्या भेटी घेऊन परिस्थिती आणि नागरिकांची होणारी अडचण समजावून सांगितली. जनतेच्या हितासाठी आपण वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून विकासासाठी सहकार्य करू असे आवाहन केले. चाटे यांनी सर्व संबंधितांच्या भेटी घेऊन सगळ्यांचे मन वळविले आणि पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला.
परळी गंगाखेड रस्त्यावरील पुलाचे काम मार्गी लागले असून कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. या कामामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि सुलभ होणार असून परळीच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
या प्रश्नासाठी प्रयत्न करणारे ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे, निळकंठ चाटे, बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक लक्ष्मण (पिंटू) मुरकुटे, भिमराव डावरे, अजय फड व सर्व सहकाऱ्यांचे स्थानिक शेतकरी, नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.



