बीड

आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न; ९ विद्यार्थ्यांची निवड

आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न; ९ विद्यार्थ्यांची निवड
आष्टी प्रतिनिधी
आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च, आष्टी (डी.फार्मसी, बी.फार्मसी व एम.फार्मसी) या कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे  मंगळवार दि. २३ जून २०२६ रोजी कॅम्पस इंटरव्ह्यूचे रोजगार मेळावाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित औषधनिर्माण कंपनी Skybiotech Life Sciences Pvt. Ltd. मध्ये महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या कॅम्पस इंटरव्यू मध्ये कॉलेजचा व  इतर कॉलेजच्या जवळजवळ 63 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहिले होते.
स्कायबायोटेक लाइफ सायन्सेस प्रा. लि. ही छत्रपती संभाजीनगर येथील औषधनिर्मिती क्षेत्रातील एक प्रगतिशील कंपनी असून दर्जेदार फार्मासुटिकल उत्पादने व सेवांसाठी ओळखली जाते.
या मुलाखतीसाठी कंपनीकडून श्री. संतोष पिंपरकर (प्रमुख – गुणवत्ता व व्यवसाय विकास), श्री. सचिन साखरे (वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक) आणि श्री. बापूसाहेब कळमकर (एचआर मॅनेजर) उपस्थित होते. विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना औषधनिर्माण उद्योगातील विविध विभागांची माहिती दिली. तसेच उत्पादन (Production), गुणवत्ता नियंत्रण (Quality Control), गुणवत्ता हमी (Quality Assurance) आदी विभागांचे कार्य, रोजगाराच्या संधी, औषधनिर्माण क्षेत्रातील आधुनिक बदल, मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास आणि मुलाखतीची भीती कशी दूर करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे कंपनीच्या Production, Quality Control आणि Quality Assurance विभागांसाठी ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. भीमरावजी धोंडे साहेब, सहसचिव डॉ. अजयदादा धोंडे, संचालक श्री. अभयराजे धोंडे, तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत श्री. शिवदास विधाते, श्री. माऊली बोडखे, श्री. संजय शेंडे, श्री सागर वाघुले श्री. संदीप नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या इंटरव्यूचे आयोजन कॉलेजमधील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलतर्फे  श्री.अभिलाष वाघमारे (सहप्राध्यापक) व श्री. अनिल धायगुडे (सहप्राध्यापक) यांनी केले.
या कॉलेजमधील बी फार्मसी व एम फार्मसी शाखा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत असून या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील विविध रोजगार व करिअर संधींबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये असतानाच कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात भविष्यातही अशा प्रकारच्या औषधनिर्माण कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे यांनी सांगितले.
Back to top button