📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गावच्या मातीचा मान राखणाऱ्या भूमिपुत्राचा दिमाखदार सन्मान..

गावच्या मातीचा मान राखणाऱ्या भूमिपुत्राचा दिमाखदार सन्मान..

जामखेड प्रतिनिधी: जामखेड तालुक्यातील जवळा गावचे भूमिपुत्र तसेच रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयातील पर्यवेक्षक संजय रामचंद्र हजारे सर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ज्योती क्रांती पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन दशरथ हजारे, युवा नेते उमेश रोडे, जवळा सोसायटीचे संचालक राजेंद्र हजारे, रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य स्वामी गुळवे, पांडुरंग कोल्हे, डॉ. किसन राऊत, डॉ. पांडुरंग हजारे, पप्पू खेत्रे, एकनाथ हजारे, जामखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक बळीराम अवसरे, तसेच आस्तिक हजारे, केशव हजारे, अनिल सिद्धलिंग हजारे, विश्वजीत हजारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास हजारे सरांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हजारे सरांच्या कन्या डॉ. प्राजक्ता हजारे यांनी आपल्या वडिलांच्या कार्याचा गौरव करत भावनिक मनोगत व्यक्त केले.

शिक्षण क्षेत्रातील हजारे सरांचे योगदान आणि त्यांच्या प्रामाणिक सेवेला उपस्थितांनी गौरवपूर्वक सलाम केला.

Back to top button