बीड

ना. पंकजाताई मुंडे यांच्या ‘रामटेक’ निवासस्थानी पर्यावरणपूरक गणरायाचे थाटात आगमन

ना. पंकजाताई मुंडे यांच्या ‘रामटेक’ निवासस्थानी पर्यावरणपूरक गणरायाचे थाटात आगमन

‘श्रीं ‘ ची उत्साहात झाली प्रतिष्ठापना ; सामान्य माणूस,  वंचितांसाठी काम करण्यासाठी शक्ती मिळावी यासाठी केली प्रार्थना

मुंबई ।दिनांक २७।:-राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन  मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या ‘रामटेक’ या शासकीय निवासस्थानी पर्यावरणपूरक गणरायाचे आज मोठ्या थाटात वाजतगाजत आगमन झाले. ना. पंकजाताई मुंडे व कुटूंबियांनी श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना केली.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी  दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीची प्रतिष्ठापना केली जाते. स्वतः पंकजाताई मुंडे या उत्सवाची सर्व तयारी करतात. गणपतीची मुर्ती आणण्यापासून ते त्याची स्थापना करण्यापर्यंत त्या स्वतः बारकाईने लक्ष घालतात, यावर्षी त्यांनी गणपतीची आरास अतिशय आकर्षक व सर्वांचे लक्ष वेधून घेणारी केली आहे. सकाळी ढोल ताशांच्या निनादात गणरायाचे आगमन झाले, त्यानंतर विधीवत पूजनाने ना. पंकजाताई मुंडे, त्यांचे चिरंजीव आर्यमान पालवे यांनी श्रींची प्रतिष्ठापना केली. यावेळी माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, अगस्त्य खाडे व कुटूंबिय उपस्थित होते.

*सामान्य माणूस अन् वंचितासाठी काम करण्याची शक्ती मिळो*
——-
बाप्पाने प्रत्येक संघर्षावर मात करून पुढे जाण्यासाठी शक्ती दिलीय. यापुढील काळात देखील सामान्य माणसासाठी, वंचितासाठी  सातत्याने काम करता यावं एवढी शक्ती मला मिळावी अशी प्रार्थना आपण बाप्पाकडे केली असल्याचं ना. पंकजाताई मुंडेंनी माध्यमाशी बोलताना सांगितलं. दरम्यान, पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या स्थापन करण्याबाबत त्या म्हणाल्या, मी आता पर्यावरण  मंत्री असले तरी फार पूर्वीपासून  माझ्या घरी मातीचाच गणपती मी आणते. तथापि पीओपी च्या मूर्त्या शक्यतो आणूच नका, आणल्याच तर त्याचे विसर्जन पर्यावरण विभाग आणि न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करावं ही लोकांकडून अपेक्षा व्यक्त आहे असं त्या म्हणाल्या.

Back to top button