बीड
मुस्लिम आरक्षण मोर्चाला आरक्षण समितीचा सशर्थ पाठिंबा जाहीर संयोजकाने आपली राजकिय भुमिका स्पष्ट करावी ॲड. प्रा. इलियास इनामदार

मुस्लिम आरक्षण मोर्चाला आरक्षण समितीचा सशर्थ पाठिंबा जाहीर संयोजकाने आपली राजकिय भुमिका स्पष्ट करावी ॲड. प्रा. इलियास इनामदार
बीड ( प्रतिनिधी ): येत्या 17 एप्रिल रोजी निघणाऱ्या मुस्लिम आरक्षण मोर्चाला महाराष्ट्र मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व लोकसेना संघटनेने काही अटींवर पाठिंबा जाहीर केला असून, मुस्लिम आरक्षण समितीचे पदाधिकारी, आरक्षणप्रेमी, लोकसेना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बीड जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष तथा लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी आपल्या हक्काच्या लढाईमध्ये बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत निरंतर सुरू राहावे. अन्यथा, मागील काही वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात भाजपाच्या इशाऱ्यावर मुस्लिम आरक्षण आंदोलन राज्यभर पेटवून पाशा पटेल नामक नेत्याने समाजाची दिशाभूल केली होती. त्यामुळे राज्यातील मुस्लिम समाजाच्या मनात आघाडी शासनाविरोधात चीड निर्माण झाली होती. सत्ता बदल होताच “कसले आरक्षण आणि कोण मुस्लिम समाज” अशी भाषा पाशा पटेलसह भाजपाच्या नेत्यांकडून ऐकण्यात आली होती. आजतागायत समाजाबद्दल बेताल वक्तव्ये करण्यात येत आहेत. व या मोबदल्यात पाशा पटेलला विधान परिषद केंद्रीय कृषी आयोग अध्यक्षपद भेटले समाजाला टाकलं चुलीत तसे आताही होऊ नये.
आरक्षण मोर्चा काढणारे कोणत्या नेत्याचे किंवा पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हेही समाजाला माहित होणे गरजचे आहे कारण संयोजक हे नगरचे खासदार निलेश लंके यांचे पी ए का कार्यकर्ते आहे अशी लोकांमध्ये शहरात चर्चा आहे यासाठी संयोजकांनी आपला सामाजिक उद्देश व राजकीय भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा भोळाभाबळा गरीब समाज कोणत्याही अफवेला भावनिक बळी पडतो, तसे होता कामा नये.
मुस्लिम आरक्षण आंदोलन ही कुणाची मक्तेदारी किंवा जागीर नाही. कोणीही समाजाच्या विषयावर आंदोलने करू शकतो; परंतु हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत निरंतर चालावे. मी लोटांगणे घालणारा किंवा मलीदा लाटणारा नेता नसून समाजाच्या वतीने नेत्यांना आरसा दाखवणारा कार्यकर्ता आहे.
मी स्वतः 20 डिसेंबर 2016 च्या मोर्चावेळी मोर्चा संयोजक होतो व मौलाना बदरुद्दीन अजमल साहेबांच्या यूडीएफ पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. परंतु मी पक्षाचा राजीनामा देऊन मुस्लिम आरक्षण आंदोलन उभे केले होते. आज लोकसेना संघटना ही फक्त सरकार, प्रशासन व सत्ताधारी राजकीय नेत्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि नव्याण्णव टक्के समाजकारण करण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे.
म्हणून माझा जनतेच्या वतीने वरील प्रश्न आहे. अन्यथा आजकालच्या कार्यकर्त्यांमध्ये झटपट “बंबईचे ट्रेंड” आलेले आहेत. लोक जमा करायचे, समाज गोळा करायचा आणि त्याचे भांडवल करून पक्षश्रेष्ठींकडून काही पद, गुत्तेदारी, निवडणूक तिकीट किंवा टेंडर मिळवायचे, असे प्रकार काही ठिकाणी पाहावयास मिळाले आहेत. असे जर झाले, तर समाज कधीही माफ करणार नाही, हेही लक्षात घ्यावे.
एवढीच विनंती मोर्चा संयोजकांना आहे आणि हीच अट व शर्ती आहे. बाकी काही नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांसह मोर्चात सहभागी राहणार असून आरक्षणप्रेमी समाजाने मोर्चामध्ये बहुसंख्येने यावे व प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला आरक्षण देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती.
जय हिंद, जय महाराष्ट्र



