बीड
विद्यार्थ्यांनी सतत आव्हान स्वीकारून त्याचा सामना करावा : डॉ. विलासराव सोनवणे

विद्यार्थ्यांनी सतत आव्हान स्वीकारून त्याचा सामना करावा : डॉ. विलासराव सोनवणे
———-
गुणवंत विद्यार्थ्यांचा आष्टी नागरी पतसंस्थेतर्फे सत्कार
———-
आष्टी, दि. (प्रतिनिधी) :- दहावी आणि बारावी या महत्त्वाच्या परीक्षेमध्ये आपण स्पृहणीय यश प्राप्त करून गुणवंत यशवंत झाला आहात. त्यामुळे तुम्ही संस्कारीत होण्याची आवश्यकता आहे आणि आगामी अभ्यासक्रम हा अत्यंत आव्हानात्मक असल्यामुळे त्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. विलासराव सोनवणे यांनी केले.
आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने रविवार दि. २९ जुन रोजी आयोजित करण्यात आलेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. विलास सोनवणे बोलत होते. यावेळी माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नवनीत कटारिया, पत्रकार उत्तम बोडखे, सौ. निर्मला सोनवणे, सौ. विद्या चव्हाण, दादासाहेब खाडे, पतसंस्थेचे कार्यकारी संचालक काकासाहेब पोकळे आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विलासराव सोनवणे म्हणाले की, आपण सर्व ग्रामीण भागातील आणि सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी असून आई- वडिलांनी अत्यंत कष्ट करून आपणास शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी अनंत बाबासाहेब घुमरे, कु. उत्कर्षा बाबासाहेब नाकाडे, अविष्कार संजय दहातोंडे, आदित्य रामदास कोल्हे, कु. अंकिता प्रविण धस, कु. आदिती सुरेश बोडखे, अक्षय एकनाथ ढोबळे,
यश अशोक कराळे, भगत हरीश कैलास, कु. अपेक्षा माणिक पठाडे, ओंकार सूर्यकांत शिंदे, कु. प्रणिती कैलास पवार, प्रेरणा भाऊसाहेब कवळे, ओंकार संजय कचरे, ओंकार बबन कोल्हे, सार्थक संजय वर्धमाने, कु. प्रज्ञा संतोष डोके, रोहित संजय नेटके, सार्थक श्रीराम भवर, अनिकेत रावसाहेब भोजने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सचिव काकासाहेब पोकळे यांनी मानले.
(चौकट)
सध्याच्या काळात अभ्यासक्रमा मध्ये खुप बदल झाला आहे. स्पर्धेच्या युगात आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थ्यांनी आपली परिस्थितीची जाण लक्षात ठेवली पाहिजे त्यासाठी व्यासनाधिन न होता निर्व्यसनी राहणे गरजेचे आहे. जर आपण आपलं सगळं लक्ष आपल्या भविष्याकडे दिले आणि परिस्थितीची जाणिव ठेवली तर यश नक्कीच मिळते, असेही डॉ. सोनवणे म्हणाले.



