बीड

३१व्या अखंड नामस्मरण सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सांगता

३१व्या अखंड नामस्मरण सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सांगता

श्री क्षेत्र दत्तमंदिरा पर्यंत ३०० मी. पायऱ्यांचे बांधकाम स्वखर्चातून करण्याचा संकल्प — राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी :
बीड तालुक्यातील पाटोदा बे (बेलखंडी) येथील श्री क्षेत्र दत्तमंदिरात ३१व्या अखंड नामस्मरण व गीता पारायण सोहळ्याची सांगता मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भाविकांच्या सोयीसाठी मंदिरापर्यंत ३०० मीटर लोखंडी ग्रीलसह पायऱ्यांचे बांधकाम स्वखर्चातून करून देण्याचा संकल्प जाहीर केला.
श्री दत्तमंदिराचे अध्यात्मिक आणि ऐतिहासिक वैभव
असलेले पाटोदा दत्तनगर येतील हे श्री दत्तमंदिर सुमारे दोनशे वर्षांहून अधिक जुने असून महानुभाव पंथाच्या परंपरेचे प्रतीक आहे. उंच टेकडीवरील या मंदिरात जाण्यासाठी वयोवृद्ध व महिला भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता पायऱ्यांचे बांधकाम झाल्यानंतर सर्व भक्तांना सुलभपणे देवदर्शन करता येईल, अशी श्रद्धाळूंची अपेक्षा आहे.

सोहळ्याचा सांगता समारंभ किर्तन केसरी परमपूज्य श्री पांढरीकर बाबा महानुभाव (खेडी खेडगाव, जळगाव) यांच्या सुश्राव्य कीर्तनाने झाली. त्यांच्या कीर्तनातून ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा संदेश सर्वत्र पसरला. या प्रसंगी

श्रीधरदादा जामोदेकर संदिपाण बडगे, रविंद्र बडगे, गणेश बडगे, आजीनाथ बडगे, कैलास बडगे, अशोक बडगे, महादेव बडगे, नवनाथ बडगे, यैगेश बडगे, गोविंद बडगे, बाबासाहेब बडगे, कालीदास बनसोडे, चक्रधर बडगे, राजेंद्र वाघमारे, दीगांबर बडगे, निवांत बडगे, हारीदास बडगे, सुनिल लोंढे, समाधान बनसोडे, राहुल बडगे, नानासाहेब बडगे, अवधूत बडगे, बळीराम बडगे, विशाल बडगे यां मान्यवरांसह
पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला मंडळी आणि असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा संगम असणारे
श्री क्षेत्र दत्तमंदिर हे केवळ पूजेचे स्थान नसून, भक्ती, श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक आहे. दरवर्षी होणारे नामस्मरण व गीता पारायण सोहळे समाजात अध्यात्मिक जागृती घडवतात. मंदिर विकासासाठी राजेंद्र मस्के यांनी घेतलेला पुढाकार ही भाविकांच्या सेवेसाठी प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे. या निर्णयाचे ग्रामस्थ व भाविकांनी उत्साहात स्वागत करून राजेंद्र मस्के यांना धन्यवाद दिले आहेत.

Back to top button