लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी —-

लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
—-
लिंबागणेश:- ( दि.११ ) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त आज दि.११ शुक्रवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आबासाहेब हांगे तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे,पत्रकार हरीओम क्षीरसागर,प्रा.लेनाजी गायकवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन भरत चौरे यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनाची महती वर्णन करताना सहशिक्षक अमर पुरी यांनी विद्येविना मती गेली! मतीविना नीती गेली!नीती विना गती गेली!गती विना वित्त गेले! वित्ताविना शुद्र खचले! इतके अनर्थ एका अविद्येने केले! महात्मा ज्योतिबा फुलेंनी जगाला दिलेल्या संदेशाची आठवण करून देत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका बनवत शुद्रांसाठी शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची जीवनगाथा वर्णन केली.शिक्षणा बरोबरच थोर समाजसुधारक असलेल्या महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्र स्थानी ठेवून पुरोगामी विचाराची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.त्याचबरोबर बालविवाहास विरोध, विधवा विवाहाला पाठींबा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचे कार्य केले असे प्रतिपादन केले.यावेळी सहशिक्षक संदिपान आगम,श्रीमती अयाचित व ग्रामस्थांची उपस्थिती होती.



