बीड
श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान महाशिवरात्र महोत्सव! सोहळ्याची ह.भ.प.लक्ष्मण मेंगडे महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान महाशिवरात्र महोत्सव! सोहळ्याची ह.भ.प.लक्ष्मण मेंगडे महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता
—
लिंबागणेश:- ( दि.२७) बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान मार्फत महाशिवरात्र महोत्सव प्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे दि.२० गुरुवार रोजी पासून पासून गुरूवर्य महंत मठाधिपती महादेव भारती महाराज आणि मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण , महाशिवरात्री महोत्सव सोहळ्याची सांगता आज दि.२७ गुरुवार रोजी अध्यक्ष बंकटस्वामी संस्थान नेकनुर ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या सुश्राव्य अमृततुल्य दहिहंडीच्या कार्यक्रमाने अर्थात काल्याच्या किर्तनाने झाली.भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतल्यापासून बालपणी केलेल्या विविध लीलांचे वर्णन त्याचप्रमाणे अवतार संपेपर्यंत जीवनप्रवासावर प्रबोधन केले. विश्वाचे मुळ भगवान परमात्मा असुन हे विश्वची माझे घर या न्यायाने माणसाने वागायला हवे.भगवंताचे नामस्मरण करायला हवं.परमात्मा सर्व जगाचा मालक असुन उपाधी विरहित भगवान परमात्म्याच्या माध्यमातून विश्वाची निर्मिती झाली असा गोड संदेश त्यांच्या वाणीतुन भाविक भक्तांना संदेश देत मंत्रमुग्ध केले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत वेगवेगळ्या विषयांवर खालिल नामांकित किर्तनकारांकडुन बबन महाराज मंझरीकर(हवेली), अक्षय महाराज पिंगळे बीड,रामायणाचार्य एकनाथ महाराज गाडे चकलांबा, वारकरी भुषण राम महाराज डोंगर आळंदी, रामहरी महाराज वायबसे सावरगाव,प्रेममुर्ती धर्मराज (दादा) महाराज सामनगाव,विनोदाचार्य दिपक महाराज बादाडे माजलगाव यांची किर्तनाद्वारे समाज प्रबोधन करत सेवा संपन्न झाली.पंचक्रोशितील विविध गावांतील मृदुंगाचार्य, वारकरी,भजनी मंडळ यांच्या द्वारे हरिजागर आणि प्रवचने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन बेलेश्वर संस्थान महाशिवरात्र उत्सव कमिटी बेलगाव, बेलगाव तरूण मंडळ, विश्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. किर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
राजकीय नेत्यांची उपस्थिती ; संस्थानच्या विकासासाठी भरीव योगदान देण्याचे आश्वासन
——
बेलेश्वर संस्थान महाशिवरात्र महोत्सव सांगता सोहळ्यात राजकीय नेत्यांची लक्षणीय उपस्थिती होती.यावेळी खा.बजरंग बप्पा सोनावणे, शिवसंग्राम राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतीताई मेटे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र मस्के, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव,सभापती बळीआप्पा गवते,मराठा सेवक हनुमान मुळीक, पंचायत समिती सदस्य पिंटु ठोंबरे, बबन माने यांची उपस्थिती होती. संस्थानच्या वतीने महंत शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला. खा.बजरंग सोनावणे, ज्योतीताई मेटे, राजेंद्र मस्के यांनी संस्थानप्रती कृतज्ञता व्यक्त करत संस्थानच्या विकासासाठी भरीव योगदान देण्याचे आश्वासन दिले.



